Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोरोनाकाळातही देशात दागिन्यांची हौस भारी, मागणी वाढली

कोरोनाकाळातही देशात दागिन्यांची हौस भारी, मागणी वाढली

भारतात ३२ टक्क्यांनी वाढली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 05:51 IST2021-05-03T05:51:17+5:302021-05-03T05:51:42+5:30

भारतात ३२ टक्क्यांनी वाढली मागणी

Even in the Corona period, the desire for jewelery was huge in the country | कोरोनाकाळातही देशात दागिन्यांची हौस भारी, मागणी वाढली

कोरोनाकाळातही देशात दागिन्यांची हौस भारी, मागणी वाढली

अविनाश कोळी
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोना काळात जागतिक स्तरावर सोन्याच्या एकूण मागणीत घट होताना सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत ५२ टक्के वाढ झाली. भारतातही दागिन्यांची हौस टिकून असल्याने पहिल्या तिमाहीत तब्बल ३९ टक्के वाढ नोंदली गेली.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (डब्ल्यूजीसी) आकडेवारीनुसार सोन्याच्या दागिन्यांची हौस पुरविण्यात चीन सर्वांत पुढे आहे. चीनमध्ये २०२१ च्या पहिल्या तिमाहीत मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत १९४ टक्के वाढ झाली आहे. भारतात जानेवारी ते मार्च २०२१ या पहिल्या तिमाहीत १०२.५ टन दागिन्यांची मागणी नोंदली गेली. त्यात प्रत्यक्ष ग्राहकांची मागणी ३७ टक्क्यांनी वाढली आहे. आपल्या शेजारील पाकिस्तानमध्ये दागिन्यांच्या मागणीत ६ टक्के घट आहे.सोन्याच्या दागिन्यांसाठी भारताची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. त्यामुळे दरवर्षी भारतात दागिन्यांची मोठी उलाढाल होत असते. 

    बिस्कीट नाण्यांची 
मागणी वाढली
n भारतात सोन्याचे बार 
(बिस्कीट) व कॉइन (नाणी) 
यामध्ये गुंतवणुकीचा कलही 
वाढला आहे. 
n मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत २०२१ मधील पहिल्या तिमाहीत यातील गुंतवणूक ३४ टक्क्यांनी वाढली आहे. 
n दुसरीकडे बँकांमधील सोन्याच्या गुंतवणुकीकडील कल कमी झाला आहे.

भारतात मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीपेक्षा २०२१ च्या पहिल्या तिमाहीतील सोन्याच्या दरात १४ टक्के वाढ नोंदली गेली आहे. या दरात आणखी वाढ नोंदली जाण्याची शक्यता आहे.

Web Title: Even in the Corona period, the desire for jewelery was huge in the country