Lokmat Money > बिझनेस न्यूज > IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा

IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा

Eppeltone Engineers IPO: कंपनीच्या आयपीओची शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग झाली. कंपनीनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे जवळजवळ दुप्पट केलेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 11:43 IST2025-06-24T11:42:17+5:302025-06-24T11:43:32+5:30

Eppeltone Engineers IPO: कंपनीच्या आयपीओची शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग झाली. कंपनीनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे जवळजवळ दुप्पट केलेत.

Eppeltone Engineers IPO listing stock market Investors money doubles on the first day 99 49 percent gain | IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा

IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा

Eppeltone Engineers IPO: Eppeltone Engineers च्या आयपीओची शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग झाली. कंपनीनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे जवळजवळ दुप्पट केलेत. कंपनी एनएसई एसएमईवर ९० टक्के प्रीमियमसह २४३.२० रुपयांवर लिस्ट झाली आहे. लिस्टिंगनंतर लगेचच कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट लागलं आहे. ५ टक्क्यांनी वाढ झाल्यानंतर, कंपनीचा शेअर २५५.३५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. शेअरची किंमत इश्यू प्राईजपेक्षा ९९.४९ टक्क्यांनी वाढली आहे.

१७ जूनला खुला झालेला आयपीओ

एप्पलटोन इंजिनिअर्सचा आयपीओ १७ जून रोजी किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुला झाला. १९ जूनपर्यंत आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी होती. कंपनीच्या आयपीओची साईज ४३.९६ कोटी रुपये आहे. हा आयपीओ पूर्णपणे फ्रेश शेअर्सवर आधारित होता. कंपनीनं ३४.३४ लाख नवे शेअर्स जारी केलेत.

युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?

१००० शेअर्सची लॉट साईज

या एसएमई आयपीओचा लॉट साइज १००० रुपये होती. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान सव्वा लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती. हा आयपीओ अँकर गुंतवणूकदारांसाठी १६ जून रोजी खुला करण्यात आला होता. अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीला १२.५२ कोटी रुपये गोळा करण्यात यश आलं. अँकर गुंतवणूकदारांना देण्यात आलेल्या ५० टक्के शेअर्सचा लॉक-इन कालावधी ३० दिवसांचा आहे. 

मिळालेलं २९६ पट सबस्क्रिप्शन 

हा आयपीओ ३ दिवसात २९६ पट सब्सक्राइब झाला होता. रिटेल कॅटेगरीत आयपीओ २४८.०४ पट सब्सक्राइब झाला होता. त्याचवेळी क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सची श्रेणी १३२.२३ पट सब्सक्राइब झाली. तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर श्रेणीत हा आयपीओ ६२८.२८ पट सब्सक्राइब झाला होता. एक्स्पर्ट ग्लोबल कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेडची या आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आले आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Eppeltone Engineers IPO listing stock market Investors money doubles on the first day 99 49 percent gain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.