EPFO Tagline Contest : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी पीएफ योजना म्हणजे म्हातारपणाची काठी समजली जाते. प्रत्येक महिन्याच्या पगारातून पीएफ कपात होतो, तेव्हा आपण विचार करतो की ही बचत आपल्याला निवृत्तीनंतर उपयोगी पडेल. पण, यावेळेस तुमचा पीएफ केवळ बचत नसून, तुमच्या रचनात्मक विचारांना मोठे बक्षीस मिळवून देऊ शकतो!
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एका खास टॅगलाइन स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेत तुम्हाला फक्त एक प्रभावी ओळ लिहायची आहे आणि तुम्ही २१,००० रुपयांपर्यंत रोख बक्षीस जिंकू शकता.
तुमची 'आयडिया' आणि २१,००० रुपये बक्षीस
ईपीएफओने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर या स्पर्धेची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे, "सर्जनशीलता दाखवा, टॅगलाइन बनवा. २१,००० रुपयांपर्यंत रोख पुरस्कार मिळवा."
बक्षीस : विजेत्याला २१,००० रुपये रोख पुरस्कार मिळेल. यासोबतच विजेत्याला दिल्लीला येण्याची संधी देखील मिळणार आहे.
अंतिम मुदत: ही स्पर्धा १ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, टॅगलाइन सबमिट करण्याची अंतिम तारीख १० ऑक्टोबर २०२५ आहे. त्यामुळे तुमच्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत!
स्पर्धेतील महत्त्वाचे नियम
सहभागी होण्यापूर्वी स्पर्धकांनी खालील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे:
- टॅगलाइन फक्त हिंदी भाषेत असावी.
- टॅगलाइन १० शब्दांपेक्षा जास्त नसावी.
- आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार केलेली टॅगलाइन ग्राह्य धरली जाणार नाही.
- प्रत्येक व्यक्तीला फक्त एकच एन्ट्री (सहभाग) देता येईल.
- टॅगलाइनसह तिचे संक्षिप्त विवरण देणे बंधनकारक आहे.
सहभाग कसा घ्यावा?
या स्पर्धेत सहभागी होण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे.
- सर्वात आधी www.mygov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- होमपेजवर “Do/Task” सेक्शनमध्ये "EPFO Tagline Contest" वर क्लिक करा.
- त्यानंतर “Login to participate” वर जाऊन लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर, तुम्ही तुमची टॅगलाइन आणि त्याचे संक्षिप्त विवरण सबमिट करू शकता.
- तुमच्या एका जबरदस्त कल्पनेमुळे तुम्हाला मोठा रोख पुरस्कार मिळू शकतो. जर तुम्ही EPFO चे सदस्य असाल किंवा आर्थिक विषयांमध्ये आवड असेल, तर लवकरात लवकर अर्ज करा!