Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पीएफच्या व्याजाला कात्री लागणार? ८.२५ टक्क्यांवरून दर कमी होण्याची चिन्हे; मार्चमधील बैठकीकडे लक्ष

पीएफच्या व्याजाला कात्री लागणार? ८.२५ टक्क्यांवरून दर कमी होण्याची चिन्हे; मार्चमधील बैठकीकडे लक्ष

EPFO Interest Rate 2026 : पीएफ धारकांसाठी एक मोठी अपडेट आली आहे. मार्चमध्ये होणाऱ्या ईपीएफओच्या बैठकीत व्याजदर कपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या, व्याजदर ८.२५% आहे, जो ८% ते ८.२०% पर्यंत घसरू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 13:44 IST2026-02-04T12:38:34+5:302026-02-04T13:44:34+5:30

EPFO Interest Rate 2026 : पीएफ धारकांसाठी एक मोठी अपडेट आली आहे. मार्चमध्ये होणाऱ्या ईपीएफओच्या बैठकीत व्याजदर कपातीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या, व्याजदर ८.२५% आहे, जो ८% ते ८.२०% पर्यंत घसरू शकतो.

EPFO May Cut Interest Rates to 8.20% in March 2026 Meeting Reports | पीएफच्या व्याजाला कात्री लागणार? ८.२५ टक्क्यांवरून दर कमी होण्याची चिन्हे; मार्चमधील बैठकीकडे लक्ष

पीएफच्या व्याजाला कात्री लागणार? ८.२५ टक्क्यांवरून दर कमी होण्याची चिन्हे; मार्चमधील बैठकीकडे लक्ष

EPFO Interest Rate 2026 : देशातील कोट्यवधी पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची आणि एक चिंतेची बातमी समोर येत आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या आगामी बैठकीत पीएफवरील व्याजाचा दर कमी करण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे तंत्रज्ञानाचा वापर वाढवत एप्रिलपासून सभासदांना थेट 'यूपीआय'द्वारे पीएफचे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

व्याजाचा दर ८ टक्क्यांपर्यंत खाली येणार?
अहवालानुसार, मार्च महिन्यात ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजची २३९ वी बैठक पार पडणार आहे. 'विकसित भारत एम्प्लॉयमेंट स्कीम'मुळे पीएफशी जोडल्या जाणाऱ्या नव्या सदस्यांची संख्या वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत संघटनेकडे पुरेसा आर्थिक बफर राखण्यासाठी व्याजाचा दर ८.२५ टक्क्यांवरून ८ ते ८.२० टक्क्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो.

निवडणुकांचे 'राजकीय कवच' व्याजाला वाचवणार?
व्याजदर कपातीचा प्रस्ताव असला तरी, आगामी काळात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुडुचेरी या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. राजकीय दबावामुळे केंद्र सरकार कामगारांची नाराजी ओढवून घेण्याचा धोका पत्करणार नाही, अशीही चर्चा आहे. त्यामुळे व्याजदर कपातीचा निर्णय काही काळासाठी लांबणीवर पडू शकतो.

अंमलबजावणीची प्रक्रिया
व्याजाचा नवा दर ठरवल्यानंतर त्याला प्रथम अर्थ मंत्रालयाची मंजुरी घ्यावी लागते. त्यानंतर कामगार आणि रोजगार मंत्रालयाकडून अधिकृत अधिसूचना जारी केली जाते.

वाचा - अमेरिकेतील एका बातमीने आयटी क्षेत्रात खळबळ! धडाधड मार्केट कोसळलं; नोकऱ्यांवरही गदा?

एप्रिलपासून पीएफचे पैसे मिळतील 'एका क्लिकवर'!
तंत्रज्ञानाच्या बाबतीत ईपीएफओ मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहे. एप्रिल २०२६ पासून पीएफ धारकांना आपल्या खात्यातून पैसे काढण्यासाठी UPI चा वापर करता येईल. यूपीआय पिन वापरून सभासद सुरक्षित व्यवहार करू शकतील आणि ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. एकदा रक्कम बँक खात्यात आली की, ती एटीएम किंवा डेबिट कार्डद्वारे सहज वापरता येईल. या सुविधेंतर्गत सदस्यांच्या खात्यात एक ठराविक किमान रक्कम सुरक्षित ठेवली जाईल आणि उर्वरित रक्कम काढता येईल.
 

Web Title : पीएफ ब्याज दर में कटौती की आशंका? मार्च बैठक पर नज़र।

Web Summary : आर्थिक दबाव के कारण पीएफ ब्याज दरें 8.25% से घट सकती हैं। अप्रैल 2026 से यूपीआई से निकासी शुरू। चुनावी राजनीति दर कटौती में देरी कर सकती है।

Web Title : PF Interest Rate Cut Looming? Eyes on March Meeting.

Web Summary : PF interest rates may decrease from 8.25% due to economic pressures. UPI withdrawals coming April 2026. Election politics might delay rate cut.