Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशात सर्वाधिक रोजगार देणाऱ्यांमध्ये 'हे' राज्य प्रथम क्रमांकावर! या ५ राज्यांचा सर्वाधिक वाटा

देशात सर्वाधिक रोजगार देणाऱ्यांमध्ये 'हे' राज्य प्रथम क्रमांकावर! या ५ राज्यांचा सर्वाधिक वाटा

Jobs in india : देशात ५ राज्यांचा एकूण रोजगार निर्मितीत ६१ टक्के वाटा आहे. म्हणजे ही ५ राज्ये संपूर्ण देशाचा आर्थिक गाडा ओढत आहे, म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 14:23 IST2024-12-26T14:23:03+5:302024-12-26T14:23:47+5:30

Jobs in india : देशात ५ राज्यांचा एकूण रोजगार निर्मितीत ६१ टक्के वाटा आहे. म्हणजे ही ५ राज्ये संपूर्ण देशाचा आर्थिक गाडा ओढत आहे, म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

epfo adds 13 41 lakh net members during october 2024 | देशात सर्वाधिक रोजगार देणाऱ्यांमध्ये 'हे' राज्य प्रथम क्रमांकावर! या ५ राज्यांचा सर्वाधिक वाटा

देशात सर्वाधिक रोजगार देणाऱ्यांमध्ये 'हे' राज्य प्रथम क्रमांकावर! या ५ राज्यांचा सर्वाधिक वाटा

Jobs in india : दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असल्याचे आकडे समोर येत आहेत. मात्र, अशातही काही राज्यांनी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यात यश मिळवलं आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) EPFO ने नुकतीच ही आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रासह आणखी काही राज्यांचा समावेश आहे. ईपीएफओमध्ये सामील होणाऱ्या सदस्यांची संख्या ऑक्टोबरमध्ये १३ लाख ४१ हजार होती. ऑक्टोबरमध्ये सुमारे ७ लाख ५० हजार नवीन सदस्य EPFO ​​मध्ये सामील झाले. यापैकी १८ ते २५ वर्षे वयोगटातील लोकांचा वाटा ५८.४९% होता. ऑक्टोबरमध्ये ५ लाख ४३ हजार लोक या वयोगटात सामील झाले. कमी वयात अधिक लोक संघटित कर्मचाऱ्यांमध्ये सामील होत असून हे प्रामुख्याने प्रथमच नोकरी शोधणारे असल्याचे कामगार मंत्रालयाने म्हटले आहे.

रोजगार देण्यात कोणतं राज्य आघाडीवर?
ऑक्टोबरमध्ये २ लाख ९ हजार नवीन महिला सदस्य ईपीएफओमध्ये सामील झाल्या. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत हे प्रमाण २.१२% अधिक आहे. ऑक्टोबरमध्ये निव्वळ महिलांची वाढ सुमारे २ लाख ७९ हजार होती. कामगार मंत्रालयाने सांगितले की, हे काम कर्मचाऱ्यांमध्ये वाढत्या वैविध्यतेचे लक्षण आहे. रोजगार देणाऱ्या आघाडीच्या ५ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचा यात जवळपास ६१.२% वाटा आहे. म्हणजेच ही ५ राज्य देशाचा आर्थिक गाडा ओढत आहे, म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या ५ राज्यांमध्ये एकूण ८ लाख २२ हजार निव्वळ सदस्य जोडणी झाली. या महिन्यात सर्वाधिक २२.१८% टक्केवारीसह महाराष्ट्र आघाडीवर आहे. मनुष्यबळ पुरवठादार, सामान्य कंत्राटदार, तज्ज्ञ सेवांसह सुरक्षा सेवा यांचा निव्वळ सदस्य वाढीसाठी सर्वाधिक ४२.३% योगदान आहे.

महिला सदस्य
पेरोल डेटानुसार, ऑक्टोबरमध्ये १२ लाख ९० हजार सदस्यांनी EPFO ​​मधून बाहेर पडले आणि त्याच महिन्यात पुन्हा जॉइन झाले. या सदस्यांनी नोकऱ्या बदलल्या आणि EPFO ​​द्वारे समाविष्ट असलेल्या आस्थापनांमध्ये पुन्हा रुजू झाले. त्यांनी अंतिम सेटलमेंटऐवजी त्यांचे जमा केलेले योगदान हस्तांतरित करण्याचा पर्याय निवडला. गेल्या वर्षीच्या तुलनेत अशा लोकांच्या संख्येत १६.२३% वाढ झाली आहे. पेरोल डेटानुसार, ऑक्टोबरमध्ये जोडलेल्या नवीन सदस्यांपैकी सुमारे २.०९ लाख नवीन महिला सदस्य आहेत.

Web Title: epfo adds 13 41 lakh net members during october 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.