Lokmat Money > बिझनेस न्यूज > कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल

कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल

एखाद्या व्यक्तीच्या किंवा मशीनच्या चुकीमुळे कर्मचाऱ्याला पगाराच्या स्वरूपात भरपूर पैसे मिळालेत अशी घटना यापूर्वी कधीतरी तुम्ही ऐकली असेल. अशावेळी कर्मचारी एकतर पैसे ठेवतो किंवा आपल्या ऑफिसला त्याची माहिती देतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 12:09 IST2025-06-21T12:09:26+5:302025-06-21T12:09:26+5:30

एखाद्या व्यक्तीच्या किंवा मशीनच्या चुकीमुळे कर्मचाऱ्याला पगाराच्या स्वरूपात भरपूर पैसे मिळालेत अशी घटना यापूर्वी कधीतरी तुम्ही ऐकली असेल. अशावेळी कर्मचारी एकतर पैसे ठेवतो किंवा आपल्या ऑफिसला त्याची माहिती देतो.

employee was speechless when he received Rs 14 crore in salary he didn t even think about what happened later. | कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल

कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल

एखाद्या व्यक्तीच्या किंवा मशीनच्या चुकीमुळे कर्मचाऱ्याला पगाराच्या स्वरूपात भरपूर पैसे मिळालेत अशी घटना यापूर्वी कधीतरी तुम्ही ऐकली असेल. अशावेळी कर्मचारी एकतर पैसे ठेवतो किंवा आपल्या ऑफिसला त्याची माहिती देतो. अशीच एक विचित्र घटना अमेरिकेतील मिशिगन मधील वेन काउंटीमध्ये घडली आहे. एका कर्मचाऱ्याला जास्त पैसे मिळाल्याची घटना समोर आलीये. ही चूक पेरोल विभागाकडून करण्यात आली. कर्मचाऱ्यानं याची माहिती कार्यालयाला दिली. त्यानंतर जबाबदार कर्मचाऱ्याला नोकरी गमवावी लागली.

१३ कोटींहून अधिक पगार

ही घटना मे महिन्यात घडली होती. त्या महिन्यात एका कर्मचाऱ्याला १६ लाख डॉलरचा चेक मिळाला. याची किंमत भारतीय रुपयात सुमारे १४ कोटी रुपये आहे. डब्ल्यूएक्सवायझेड चॅनेल ७ च्या रिपोर्टनुसार, ही चूक एका सुपरवायझरमुळे झाली. मुळात या कर्मचाऱ्याला पगारवाढ मिळाली होती. त्याच्या सुपरवायझरनं कम्प्युटरमध्ये माहिती टाकत असताना चुकून तासाच्या दराऐवजी कर्मचारी आयडी क्रमांक लिहिला. त्यामुळे एवढी मोठी रक्कम त्याला मिळाली.

R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

कर्मचारी होता प्रामाणिक

चांगली गोष्ट म्हणजे कर्मचारी प्रामाणिक होता. पगाराच्या रूपात एवढे पैसे मिळताच तो अवाक् झाला. सुरुवातीला त्याला ही आपली पगारवाढ वाटली. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की यात काहीतरी गडबड आहे. दुसऱ्या दिवशी त्यानं आपल्या सुपरवायझरला ही गोष्ट सांगितली. हा कर्मचारी गेल्या २० वर्षांपासून काउंटीमध्ये काम करत आहे.

मात्र या घटनेनंतर काही जणांना याचे परिणाम भोगावे लागले. या चुकीला जबाबदार असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात आलं. तर तिसऱ्या कर्मचाऱ्याला काही काळासाठी निलंबित करण्यात आलं. ही चूक पकडता यावी यासाठी यंत्रणेत अनेक तपासण्या व्हायला हव्या होत्या, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. 

यापूर्वीही झालीये चूक

वेन काउंटीच्या नवीन वेतन पेरोल सिस्टममध्ये गडबड ही पहिलीच वेळ नाही. ही प्रणाली ओरेकलच्या सॉफ्टवेअरवर तयार केली गेली आहे आणि गेल्या वर्षी ती सुरू करण्यात आली होती. ऑगस्टमध्ये शेरीफच्या शेकडो कर्मचाऱ्यांना कमी पगार देण्यात आला. काहींना अजिबात पगार मिळाला नाही. कर्मचाऱ्यांचं म्हणणे आहे की अनेक लोकांना अद्याप नवीन प्रणालीचं पूर्ण प्रशिक्षण मिळालेलं नाही. म्हणूनच अशा चुका होत आहेत.

जुन्या वेतनाचा तपास होणार

काउंटी कमिशनच्या अध्यक्षा अलिशा बेल यांनी मागील सर्व देयकांची चौकशी करण्याचं आवाहन केलं आहे. त्या म्हणाल्या की छोट्या चुका कदाचित दिसून येणार नाही. "जर ती १०० किंवा २०० डॉलर्सची चूक असती तर कदाचित कोणाच्या लक्षातही आलं नसते. पण दहा लाख डॉलर्स? ते अगदी स्पष्टपणे दिसून येतात," असं त्या म्हणाल्या.

Web Title: employee was speechless when he received Rs 14 crore in salary he didn t even think about what happened later.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MONEYपैसा