Lokmat Money > बिझनेस न्यूज > Emerald Tyres IPO: एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्सचा कर्ताधर्ता कोण? जाणून घ्या कंपनीची सगळी कुंडली

Emerald Tyres IPO: एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्सचा कर्ताधर्ता कोण? जाणून घ्या कंपनीची सगळी कुंडली

Emerald Tyres IPO : टायर तयार करणारी कंपनी एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेडचा आयपीओ १२ डिसेंबर रोजी लिस्ट होण्याचा अंदाज आहे. पण, ही कंपनी कोणाची, काय काय करते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 15:40 IST2024-12-05T15:38:06+5:302024-12-05T15:40:01+5:30

Emerald Tyres IPO : टायर तयार करणारी कंपनी एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेडचा आयपीओ १२ डिसेंबर रोजी लिस्ट होण्याचा अंदाज आहे. पण, ही कंपनी कोणाची, काय काय करते?

emerald tyres manufacturer ipo who is the owner of emerald tyres | Emerald Tyres IPO: एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्सचा कर्ताधर्ता कोण? जाणून घ्या कंपनीची सगळी कुंडली

Emerald Tyres IPO: एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्सचा कर्ताधर्ता कोण? जाणून घ्या कंपनीची सगळी कुंडली

Emerald Tyres Manufacturer IPO: सध्या एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेडचा आयपीओ खूप चर्चेत आहे. ग्रे मार्केटमध्येही याची स्थिती चांगली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचे या आयपीओने लक्ष वेधून घेतले आहे. हा आयपीएओ ५ डिसेंबर ते ९ डिसेंबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला असणार आहे. या माध्यमातून ४९ कोटी रुपये मिळवण्याचे उद्दिष्ट कंपनीचे आहे. तुम्हाला जर आयपीओ खरेदी करण्यासंदर्भात विचार करत असाल, तर आधी कंपनीबद्दल जाणून घ्या. 

एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स काय काय करते?

Emerald Tyre Manufacturers कंपनी २००२ मध्ये सुरू झाली. टायर उत्पादन आणि त्यांचा पुरवठा करण्याचे काम ही कंपनी करते. त्याचबरोबर फोर्कलिफ्ट, स्किड लोडर, विमानतळावरील सहाय्यक उपकरणे, पोर्ट ट्रेलर, कृषी उपकरणे, लॉन आणि गार्डनर मावर, उत्खनन उपकरणे, खांब किंवा उचं जागेवर करण्यासाठी वापरले जाणारे वर्क प्लॅटफॉर्म ट्रक आदी गोष्टींची निर्मिती करते. कंपनीचे तामिळनाडूतील तिरुवल्लूर जिल्ह्यातील गुम्मिदीपोंडी येथे उत्पादन निर्मिती प्रकल्प आहे. हा प्रकल्प जवळपास १० एकर जागेवर पसरलेला आहे. 

एमराल्ड टायर्स परदेशातही देते सेवा

एमराल्ड टायर्स मॅन्युफॅक्चरर्सचे जाळे जवळपास ७० देशांमध्ये विस्तारलेले आहे. या कंपनीचे अनेक जागतिक भागीदारही आहेत. ओईएम आणि ब्लू चिप कॉर्पोरेट्स यांना कंपनी सेवा देते. बेल्जियम, युएई, युएसए स्थित कपंनीचे गोडाऊन युरोप, मध्य पूर्व आणि उत्तर अमेरिकेत ग्राहकांना सेवा पुरवतात. 

एमराल्ड टायर कंपनीच्या संचालक मंडळात कोण आहेत?

एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि संचालक चंद्रशेखरन तिरुपती वेंकटचलम आहेत. त्याचबरोबर मंडळात इतर सदस्यही आहेत. यात ईश्वर कृष्णानंद हे पूर्णवेळ संचालक आहेत. नरसिह्मन स्वतंत्र संचालक आहेत. कृष्णा मूर्ती सुब्रमण्यम अय्यर स्वतंत्र संचालक, कृष्णाराम प्रिया वेदवल्ली कार्यकारी महिला संचालक आहेत. 

आर्थिक स्थिती कामगिरी कशी आहे?

एमराल्ड टायर मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेडने चालू आर्थिक वर्षात ३१ जुलैच्या अखेरीस ६४.९२ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला आहे. तर करानंतर कंपनीचा नफा ४.१३ कोटी रुपये इतका होता. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीचा महसूल १७१ कोटी रुपये आणि पीएटी १२.१४ कोटी रुपये नोंदवला गेला आहे. 

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.) 

Web Title: emerald tyres manufacturer ipo who is the owner of emerald tyres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.