Lokmat Money > बिझनेस न्यूज > ५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार! मासिक ५००० गुंतवणूक

५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार! मासिक ५००० गुंतवणूक

Regular Income : तुम्ही नोकरीला लागल्यापासून निवृत्तीचे नियोजन केलं तर वयाच्या पन्नाशीतच तुमच्याकडे कोट्यवधी रुपयांचा फंड असेल. यातून तुम्ही दरमहा १ लाख रुपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:20 IST2025-07-15T14:25:10+5:302025-07-15T15:20:03+5:30

Regular Income : तुम्ही नोकरीला लागल्यापासून निवृत्तीचे नियोजन केलं तर वयाच्या पन्नाशीतच तुमच्याकडे कोट्यवधी रुपयांचा फंड असेल. यातून तुम्ही दरमहा १ लाख रुपयांपर्यंत पेन्शन मिळवू शकता.

Early Retirement Dream How SIP to SWP Can Give You ₹1 Lakh Monthly by 50 | ५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार! मासिक ५००० गुंतवणूक

५० व्या वर्षी निवृत्त व्हायचंय? 'या' स्मार्ट प्लॅनने मिळवा दरमहा १ लाख रुपये पगार! मासिक ५००० गुंतवणूक

SWP New Calculator : नोकरीची सुरुवात करताच निवृत्तीचा विचार करणे हा एका शहाण्या गुंतवणूकदाराचा गुणधर्म आहे. ईपीएफ किंवा एनपीएस सारख्या सरकारी योजना भविष्यासाठी मोठा निधी आणि नियमित उत्पन्न देतात. पण, याशिवायही तुम्ही तुमच्या नियमित बचतीद्वारे निवृत्तीनंतर तुमच्या सध्याच्या पगाराइतकेच नियमित उत्पन्न मिळवण्याची व्यवस्था करू शकता. यासाठी एसआयपी आणि त्यानंतर एसडब्ल्यूपी हे नियोजन तुम्हाला खूप मदत करेल.

पन्नाशीत निवृत्त होण्याचा कल वाढतोय
निवृत्तीसाठी योग्य वेळी नियोजन आणि गुंतवणूक सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही लवकर आणि हुशारीने नियोजन केले, तर तुम्हाला निवृत्तीसाठी ५५ किंवा ५८ वर्षांपर्यंत वाट पाहावी लागणार नाही. तुम्ही पारंपरिक निवृत्तीच्या वयाच्या खूप आधीच आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकता. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, खाजगी क्षेत्रात ५० वर्षे हे आता निवृत्तीचे नवीन वय बनत आहे. भारतातील तरुणही आता ५० व्या वर्षी निवृत्त होण्याचा विचार करत आहेत.

नोकरीत असतानाच तयार करा मोठा फंड!
सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅन सुरू करण्यापूर्वी, तुम्हाला त्यासाठी एक मोठा निधी तयार करावा लागेल. समजा, तुम्ही सध्या २८ वर्षांचे आहात आणि ५० व्या वर्षी निवृत्त होण्याचा विचार करत आहात. याचा अर्थ तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी २२ वर्षांचा कालावधी आहे. या २२ वर्षांसाठी तुम्ही गुंतवणुकीसाठी एसआयपीचा पर्याय निवडू शकता.

अनेक म्युच्युअल फंड योजनांनी गेल्या २० ते २२ वर्षांत १५ ते १८ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. आपण येथे २२ वर्षांसाठी एसआयपीवर १२ टक्के वार्षिक परतावा गृहीत धरू. ही गणना दरमहा ५,००० रुपयांच्या एसआयपीवर आधारित आहे.

२२ वर्षांसाठी एसआयपी कॅल्क्युलेटर (५,००० मासिक)

  • मासिक एसआयपी: ५,००० रुपये
  • गुंतवणूक कालावधी: २२ वर्षे
  • अंदाजित परतावा: १२% वार्षिक
  • २२ वर्षांनंतर गुंतवणुकीचे मूल्य: १,०३,५३,२९५ (म्हणजेच सुमारे १.०४ कोटी)
  • याचा अर्थ, दरमहा फक्त ५,००० रुपये गुंतवून तुम्ही निवृत्तीसाठी १ कोटींहून अधिकचा निधी तयार करू शकता!

SWP कॅल्क्युलेटर: निवृत्तीनंतर मिळवा दरमहा १ लाख रुपये!
एकदा तुमचा १ कोटी रुपयांचा निधी तयार झाला की, तुम्ही सिस्टीमॅटिक विथड्रॉवल प्लॅनद्वारे त्यातून नियमित पैसे काढू शकता.

SWP कॅल्क्युलेटर (१ कोटी रुपयांच्या फंडावर आधारित)

  • एक वेळ गुंतवणूक (फंड): १,००,००,००० (१ कोटी)
  • गुंतवणूक कालावधी (SWP सुरू ठेवल्यास): २२ वर्षे
  • अंदाजित परतावा (SWP सुरू असताना): १२% वार्षिक
  • दरमहा पैसे काढण्याची रक्कम: १,००,००० रुपये (१ लाख)
  • २२ वर्षांत काढलेली एकूण रक्कम: २,६४,००,००० रुपये (२.६४ कोटी)
  • २२ वर्षांनंतरही शिल्लक राहिलेली रक्कम: ४०,१९,७२७ रुपये (सुमारे ४०.२० लाख)
  • तुमच्या गुंतवणुकीवर एकूण परतावा: २,०४,१९,७२७ रुपये (२.०४ कोटी)

याचा अर्थ, तुम्ही तयार केलेल्या १ कोटींच्या फंडातून २२ वर्षे दरमहा १ लाख रुपये काढू शकता आणि तरीही तुमच्याकडे ४० लाखांहून अधिक रक्कम शिल्लक राहील! याव्यतिरिक्त, तुमच्या मूळ गुंतवणुकीवर तुम्हाला २.०४ कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा मिळेल.

वाचा - SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?

हा एसआयपी ते एसडब्ल्यूपी प्रवास तुम्हाला तरुण वयातच आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देऊ शकतो आणि निवृत्तीनंतरही तुम्हाला नियमित उत्पन्नाची खात्री देतो. 

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Early Retirement Dream How SIP to SWP Can Give You ₹1 Lakh Monthly by 50

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.