e-Aadhaar App : भारतात आधार कार्डशिवाय तुमचं कोणतंही सरकारी काम होत नाही. अशा परिस्थितीत आधार कार्ड वेळोवेळी अपडेट करणे फार महत्त्वाचे आहे. तुम्हाला तुमचं आधारकार्ड अपडेट करायचं असेल तर आनंदाची बातमी आहे. कारण, आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया आता खूप सोपी होणार आहे. केंद्र सरकारने यासाठी 'ई-आधार ॲप' लॉन्च करण्याची तयारी सुरू केली आहे. या नवीन मोबाईल ॲप्लिकेशनमुळे आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरूनच आधार कार्डातील अनेक तपशील बदलू शकणार आहात.
सध्या नाव, जन्मतारीख किंवा पत्ता बदलण्यासाठी नागरिकांना आधार सेवा केंद्रावर जावे लागते. पण, या नव्या ॲपमुळे ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल आणि अत्यंत वेगवान होईल.
आता घरी बसून आधार अपडेट करा
- ई-आधार ॲपचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, नागरिक पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि इतर लोकसंख्याशास्त्रीय माहिती घरी बसून अपडेट करू शकतील.
- वारंवार केंद्रावर जाण्याची गरज संपेल. ॲपमध्ये काही सोप्या स्टेप्स फॉलो करून कागदपत्रांचे काम आणि लांब रांगा टाळता येतील.
- केवळ बायोमेट्रिक बदल (उदा. फिंगरप्रिंट किंवा आयरीस स्कॅन) करण्यासाठीच आधार केंद्रावर जावे लागेल.
सुरक्षेसाठी AI आणि फेशियल रिकग्निशन
- या ॲपमध्ये सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.
- फेशियल रिकग्निशन : ई-आधार ॲपमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. ॲप वापरकर्त्याची ओळख चेहरा जुळवून निश्चित करेल.
- सुरक्षित बदल : यामुळे केवळ वैध नागरिकच त्यांच्या आधार तपशिलांमध्ये बदल करू शकतील आणि डेटा सुरक्षित राहील.
भविष्याची तयारी आणि वेग
हा ॲप थेट सरकारी डेटाबेसशी जोडला जाईल, ज्यामुळे तुमच्या कागदपत्रांची पडताळणी त्वरित होईल.
पूर्वी अपडेट्स होण्यासाठी अनेक दिवस लागायचे, ते आता या ॲपमुळे काही तासांतच पूर्ण होतील.
अहवालानुसार, हा ॲप २०२५ च्या अखेरीस Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होईल. तसेच, तो DigiLocker आणि UMANG सारख्या डिजिटल सेवांसोबतही काम करेल.
वाचा - घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
ई-आधार ॲपच्या मदतीने भारतीय नागरिक त्यांचे आधार रेकॉर्ड कुठूनही, सुरक्षितपणे आणि वेगाने व्यवस्थापित करू शकतील, ज्यामुळे डिजिटल इंडियाचे स्वप्न आणखी मजबूत होईल.
