lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कोरोनाकाळात सरकारी खर्चात झाली केवळ ११ टक्के वाढ

कोरोनाकाळात सरकारी खर्चात झाली केवळ ११ टक्के वाढ

एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये सरकारच्या खर्चामध्ये केवळ ११ टक्के वाढ झाल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 05:37 AM2020-09-04T05:37:57+5:302020-09-04T05:38:08+5:30

एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये सरकारच्या खर्चामध्ये केवळ ११ टक्के वाढ झाल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

During the Corona period, government spending increased by only 11 per cent | कोरोनाकाळात सरकारी खर्चात झाली केवळ ११ टक्के वाढ

कोरोनाकाळात सरकारी खर्चात झाली केवळ ११ टक्के वाढ

नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेमध्ये घट होत असल्याने रिझर्व्ह बँकेसह अन्य तज्ज्ञ सरकारी खर्चात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करीत आहेत. असे असले तरी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांमध्ये सरकारच्या खर्चामध्ये केवळ ११ टक्के वाढ झाल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.
सरकारच्या खर्च विभागाचे संचालक आणि उपसचिव यांच्या बैठकीत सीतारामन यांनी वरील माहिती दिली. कोरोनानंतर देशातील मागणी वाढण्यासाठी सरकारकडून बूस्टर डोसची अपेक्षा आहे.

भारताला देणार ६.५ अब्ज डॉलर
नवी दिल्ली : जागतिक बँक आणि आशियाई विकास बँक (एडीबी) या जागतिक संस्थांनी कोविड-१९ विरोधातील लढ्यासाठी भारताला ६.५ अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ४८ हजार कोटी रुपयांचे अर्थसाह्य देण्याचे मान्य केले आहे. अर्थसंकल्पातील अंदाजापेक्षा ही रक्कम पाचपट अधिक आहे. या संस्थांकडून यंदा भारताला १.२९ अब्ज डॉलर म्हणजेच ९,५५८ कोटी रुपये अर्थसाह्य मिळेल, असा अंदाज अर्थसंकल्पात होता.











यातील मोठा हिस्सा तातडीची मदत म्हणून चालू वित्त वर्षातच मिळणार आहे. काही रक्कम मात्र २0२१-२२ मध्ये मिळेल. यातील सर्वाधिक २.७५ अब्ज डॉलरचा निधी जागतिक बँकेकडून कोविड मदत पॅकेजच्या स्वरूपात मिळणार आहे.
आरोग्य सुविधा आणि त्यासंबंधित पायाभूत सुविधा उभारण्यासाठी निधी देण्यास जागतिक संस्थांनी हात मोकळा सोडला आहे. त्यामुळे भारत सरकारला मिळू शकणाऱ्या रकमेत वाढ होऊ शकते.
 

Web Title: During the Corona period, government spending increased by only 11 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.