Lokmat Money > बिझनेस न्यूज > "नंतर सांगू नका की इशारा दिला नव्हता, सर्व क्रॅश होणार," Rich Dad Poor Dad चे लेखक कियोसाकी नक्की काय म्हणाले

"नंतर सांगू नका की इशारा दिला नव्हता, सर्व क्रॅश होणार," Rich Dad Poor Dad चे लेखक कियोसाकी नक्की काय म्हणाले

आपण सुखासुखी आयुष्य जगायचं आणि भरपूर पैसा असावा, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी लोक मेहनत घेतात, पण प्रत्येकजण हे स्वप्न पूर्ण करू शकत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:01 IST2025-06-04T11:59:48+5:302025-06-04T12:01:22+5:30

आपण सुखासुखी आयुष्य जगायचं आणि भरपूर पैसा असावा, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी लोक मेहनत घेतात, पण प्रत्येकजण हे स्वप्न पूर्ण करू शकत नाही.

Don't say later that you didn t warn everything will crash what rich dad poor dad author robert kiyosaki exactly said | "नंतर सांगू नका की इशारा दिला नव्हता, सर्व क्रॅश होणार," Rich Dad Poor Dad चे लेखक कियोसाकी नक्की काय म्हणाले

"नंतर सांगू नका की इशारा दिला नव्हता, सर्व क्रॅश होणार," Rich Dad Poor Dad चे लेखक कियोसाकी नक्की काय म्हणाले

आपण सुखासुखी आयुष्य जगायचं आणि भरपूर पैसा असावा, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी लोक मेहनत घेतात, पण प्रत्येकजण हे स्वप्न पूर्ण करू शकत नाही. झटपट पैसे कमावण्यासाठी काही लोक शेअर बाजार, बाँड्स आणि रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक करतात, पण 'रिच डॅड पुअर डॅड'चे लेखक रॉबर्ट टी. कियोसाकी यांना वाटतं की हे सगळं वाया जाणार आहे आणि आता ती वेळ आली आहे. त्यांनी सोनं-चांदी आणि बिटकॉईनला वाईट काळातील आधार म्हणून वर्णन केलंय.

'इतिहासातील सर्वात मोठी घसरण येणार' 

रॉबर्ट कियोसाकी यांनी आपल्या नव्या सोशल मीडिया पोस्टमध्ये गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा सावध केलंय. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेली पोस्ट सध्या व्हायरल होतेय. "मी कोणालाही इशारा दिला नाही असं म्हणू नका, माझ्या 'रिच डॅड्स प्रोफेसी' (२०१३) या पुस्तकात सांगितल्याप्रमाणे इतिहासातील सर्वात मोठी घसरण होणार आहे. घसरणीची आता वेळ आली आहे आणि ती पुढेही कायम राहील. दुर्दैवाने, शेअर आणि बाँड बाजाराच्या घसरणीत कोट्यवधी लोक, विशेषत: माझ्या पिढीतील बूमर्स नष्ट होतील," असं ते म्हणाले.

जगाला धमकी देता देता ट्रम्प यांनी आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेतली, अमेरिकेबाबत आली वाईट बातमी

ते लोक श्रीमंत बनतील

'रिच डॅड पुअर डॅड' या पुस्तकाच्या लेखकानं आपल्या पोस्टमध्ये आणखी एक दिलासाही दिला आहे. रॉबर्ट कियोसाकी यांच्या मते, या इशाऱ्यासह चांगली बातमी अशी आहे की, "सक्रिय गुंतवणूकदार असलेले लाखो लोक खूप श्रीमंत होऊ शकतात आणि आपल्याला माहित आहे की आपण अशा लोकांपैकी एक व्हावं जे खूप श्रीमंत होणार आहेत. जेव्हा शेअर्स, बाँड्स आणि रिअल इस्टेट बाजार कोसळतील, तेव्हा जगातील कोट्यवधी लोक सोनं, चांदी आणि बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करतील आणि श्रीमंत होतील."

रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा चांदीत सर्वाधिक गुंतवणुकीचं समर्थन केलंय. सर्वात चांगला व्यवहार हा चांदीचा असू शकतो आणि २०२५ मध्ये चांदीचा दर ३ पटीनं वाढू शकतो. चांगली बातमी अशी आहे की चांदी अजूनही त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा ६०% खाली आहे. चांदीचा भाव प्रति औंस ३५ डॉलरच्या आसपास आहे, याचा अर्थ असा आहे की जगात कोठेही जवळजवळ प्रत्येकाला श्रीमंत होण्याची संधी आहे, तर शेअर्स, बाँड आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणारे लाखो लोक गरीब होत आहेत, असंही ते म्हणाले. याशिवाय ते सोनं आणि बिटकॉईनवरही बुलिश दिसून येत आहेत.

Web Title: Don't say later that you didn t warn everything will crash what rich dad poor dad author robert kiyosaki exactly said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.