Lokmat Money > बिझनेस न्यूज > Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

Donald Trump Tariff News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर कर वाढवले आहेत. २५ टक्क्यांपासून सुरुवात केलेले कर आता ५० टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 13:20 IST2025-08-08T13:17:01+5:302025-08-08T13:20:18+5:30

Donald Trump Tariff News : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर कर वाढवले आहेत. २५ टक्क्यांपासून सुरुवात केलेले कर आता ५० टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत.

Donald Trump Tariff News What was feared happened Many companies, including Walmart and Amazon, put orders on hold in India | Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

Donald Trump Tariff News : मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) यांनी भारतावर कर लादण्याचा सपाटाच लावलाय. २५ टक्क्यांपासून सुरू झालेला कर आता ५० टक्क्यांपर्यंत पोहोचलाय. आता या कराचा परिणाम दिसण्यास सुरुवात झाली. 

कर लादल्यानंतर, वॉलमार्ट, अमेझॉन ( Amazon ), टार्गेट आणि गॅप यासारख्या प्रमुख अमेरिकन किरकोळ विक्रेत्यांनी आता भारतातील ऑर्डर रोखून ठेवल्या आहेत. याची भीती आधीच भारतीयांना होती. सध्या तेच घडत आहे. कर वाढवण्याचा परिणाम दिसायला सुरूवात झाली. 

३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?

भारतीय निर्यातदारांना अमेरिकन खरेदीदारांकडून पुढील सूचना मिळेपर्यंत कपड्यांची निर्यात थांबवण्याची विनंती करणारे पत्रे आणि ईमेल मिळालेत.

खर्च ३५ टक्क्यांनी वाढेल

अमेरिकन कंपन्यांना भारतीय निर्यातदारांना टॅरिफमुळे वाढलेल्या खर्चाचा भार सहन करावा असं वाटतंय. टॅरिफमुळे अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किमती ३० ते ३५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. वेल्सपन लिव्हिंग, गोकलदास एक्सपोर्ट्स, इंडो काउंट आणि ट्रायडंट सारखे भारतातील प्रमुख निर्यातदार त्यांच्या ४० ते ७० टक्के वस्तू अमेरिकेत विकतात.  ( Donald Trump )

कापड उद्योगावर परिणाम होणार

आता अमेरिकेला जाणारे ऑर्डर थांबवल्यामुळे व्यापारात ४० ते ५० टक्के घट होऊ शकते. भारतातून सर्वात जास्त कपडे अमेरिकेत निर्यात केले जातात. पण टॅरिफमुळे भारताचे ऑर्डर बांगलादेश आणि व्हिएतनामला जाऊ शकतात.

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादलाय. बांगलादेश आणि व्हिएतनामवर तो फक्त २० टक्के आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाला भारताने विरोध केला होता. हा निर्णय अतार्किक असल्याचे म्हटले होते, पण, ट्रम्प त्यावर ठाम आहेत.  (Tariff News )

 अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ( Donald Trump ) यांनी भारतावर ५० टक्के कर लादला आहे. ट्रम्प यांनी भारतासोबतच्या व्यापारावरही चर्चा थांबवल्या आहेत. यानंतर आता अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे विधान समोर आले आहे. या विधानानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे भारताविषयी विधाने वेगवेगळी असल्याचे दिसत आहे. 

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने भारताबाबत संयमी भूमिका घेण्याचा प्रयत्न केलाय. 'भारत आमचा धोरणात्मक भागीदार आहे आणि आम्ही उघडपणे बोलतो आणि भविष्यातही असेच बोलत राहू', असं परराष्ट्र विभागाचे म्हणणे आहे. ( Tariff News )

परराष्ट्र मंत्रालयाचे विधान काय आहे?

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे भारतावरील टॅरिफबाबत ( Tariff News ) पहिल्यांदाच विधान समोर आले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाच्या उलट विधान परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे. परराष्ट्र विभागाचे प्रमुख उपप्रवक्ते टॉमी पिगॉट म्हणाले, "भारताच्या संदर्भात, मी एवढेच म्हणू शकतो की व्यापार असमतोल आणि रशियन तेल खरेदीबाबत राष्ट्रपती त्यांच्या चिंतांबद्दल अगदी स्पष्ट आहेत. तुम्ही त्यांना या प्रकरणात थेट कारवाई करताना पाहिले आहे." भारत हा एक धोरणात्मक भागीदार आहे त्यांच्याशी आमचा पूर्ण आणि स्पष्ट संवाद आहे आणि हे सुरूच राहील.

Web Title: Donald Trump Tariff News What was feared happened Many companies, including Walmart and Amazon, put orders on hold in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.