फक्त एका वर्षात १३,०००% चा जबरदस्त परतावा देणारा स्मॉलकॅप स्टॉक आरआरपी सेमीकंडक्टर पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी कारण आहे एक अफवा, ज्यात दावा केला गेला की मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं यात गुंतवणूक केली आहे. अलीकडेच सोशल मीडियावर ही चर्चा जोर धरू लागली होती की मास्टर ब्लास्टरनं या कंपनीत पैसे लावले आहेत, त्यानंतर शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर बीएसईवर गेल्या दहा महिन्यांत ₹१० वरून ९,००० रुपयांपर्यंत पोहोचला - म्हणजेच गुंतवणूकदारांना अतुलनीय परतावा मिळाला. पण आता कंपनीनं स्वतः पुढे येऊन हे दावे पूर्णपणे फेटाळून लावलेत.
१४ ऑक्टोबर रोजी एका रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये आरआरपी सेमीकंडक्टरने स्पष्टपणे सांगितले की सचिन तेंडुलकरचा कंपनीशी काहीही संबंध नाही. त्यांनी ना कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत, ना ते शेअरहोल्डर आहेत. ते ना बोर्डमध्ये सामील आहेत, ना कोणत्याही प्रकारच्या सल्लागाराच्या भूमिकेत आहेत. कंपनीचं म्हणणं आहे की काही 'अयोग्य आणि दिशाभूल करणारे हेतू' असलेले लोक सोशल मीडियावर या अफवा पसरवत आहेत, ज्यामुळे स्टॉकच्या किमतीत अचानक वाढ झाली.
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
सचिन तेंडुलकरशी संबंधित अफवांचे खंडन
आरआरपी सेमीकंडक्टरने स्पष्ट केलंय की सचिन तेंडुलकर कंपनीचा ब्रँड ॲम्बेसेडर नाही. याव्यतिरिक्त, अफवांमध्ये सांगितल्याप्रमाणे, कंपनीला महाराष्ट्र सरकारकडून १०० एकर जमीन देखील मिळालेली नाही. कंपनीनं हे देखील मान्य केलंय की तिची आर्थिक स्थिती इतकी मजबूत नाही की शेअरची किंमत इतक्या वेगानं वाढण्याचं ते योग्य कारण ठरू शकेल. ही बाब कंपनीनं यापूर्वीही बीएसईला (BSE) सांगितली होती. आरआरपी सेमीकंडक्टरच्या एकूण शेअर्सपैकी सुमारे ९९% शेअर्स लॉक-इन आहेत. कंपनीच्या संचालक मंडळाच्या सदस्यांनी किंवा प्रमुख अधिकाऱ्यांनी कंपनीच्या शेअर्सचं ट्रेडिंग केलेलं नाही।
सामान्य लोकांकडे केवळ सुमारे ४,००० शेअर्स
सामान्य लोकांकडे केवळ सुमारे ४,००० शेअर्स आहेत, जे डिमॅट (डिजिटल) फॉर्ममध्ये आहेत। कंपनीचं म्हणणं आहे की काही लोक या कमी शेअर्सची अनैतिक पद्धतीने खरेदी-विक्री करत आहेत. यामुळे कंपनी आणि सचिन तेंडुलकर या दोघांचीही प्रतिमा खराब होत आहे. कंपनीने या खोट्या अफवा आणि बदनामी करणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. कंपनीचा प्राइस-टू-अर्निंग (P/E) रेशो १,७६४ आहे, जो इंडस्ट्रीच्या सरासरी ७३.३३ पेक्षा खूप जास्त आहे. हे दर्शवते की कंपनीच्या शेअर्सची किंमत तिच्या खऱ्या नफ्याच्या तुलनेत खूप वाढली आहेय विशेष म्हणजे, कंपनीच्या प्रमोटर्सकडे केवळ १.२८% शेअर्स आहेत, तर उर्वरित ९८.७२% शेअर्स सामान्य लोकांकडे आहेत. यापूर्वी मार्च २०२४ मध्ये प्रमोटर्सकडे ७४.५% शेअर्स होते, जे आता खूप कमी झाले आहेत.
३१ कोटींचा व्यवसाय आणि वाढता नफा
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये कंपनीचा एकूण व्यवसाय ३१.५९ कोटी रुपये राहिला, जो मागील वर्षाच्या ३८ लाख रुपयांपेक्षा खूप जास्त आहे. त्याचप्रमाणे यावर्षी कंपनीला ८.४ कोटी रुपयांचा नफा झाला, तर मागील वर्षी कंपनीला थोडं नुकसान झालं होतं. आरआरपी सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात काम करते. ही कंपनी सेमीकंडक्टर्स आणि डिजिटल चिप्सचा व्यापार करते.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)