Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

DMR Hydroengineering & Infrastructures: बीएसईवर कंपनीचे शेअर्स ४.७६ टक्क्यांनी वाढून ₹१४९.८० वर पोहोचले. शेअर्समध्ये झालेल्या या वाढीमागे एक घोषणा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 16:17 IST2025-08-20T16:17:10+5:302025-08-20T16:17:10+5:30

DMR Hydroengineering & Infrastructures: बीएसईवर कंपनीचे शेअर्स ४.७६ टक्क्यांनी वाढून ₹१४९.८० वर पोहोचले. शेअर्समध्ये झालेल्या या वाढीमागे एक घोषणा आहे.

DMR Hydroengineering & Infrastructures company will give 8 bonus shares August 28 is the record date investors rush to buy shares | 'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

DMR Hydroengineering & Infrastructures: आज, बुधवार, २० ऑगस्ट रोजी बीएसई एसएमई स्टॉक डीएमआर हायड्रोइंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्सचे शेअर्स फोकसमध्ये होते. बीएसईवर कंपनीचे शेअर्स ४.७६ टक्क्यांनी वाढून ₹१४९.८० वर पोहोचले. शेअर्समध्ये झालेल्या या वाढीमागे एक घोषणा आहे. खरं तर, कंपनीनं ५:८ च्या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याची रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. बुधवारी पहाटेच्या सत्रात हा शेअर ₹१४७ वर उघडला, तर मंगळवारी तो ₹१४३ वर बंद झाला. बीएसई एसएमई स्टॉक सध्या गेल्या वर्षी १५ सप्टेंबर रोजी झालेल्या ₹२०८.४६ या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी किमतीपेक्षा ३९ टक्क्यांहून अधिक घसरणीसह व्यवहार करत आहे.

रेकॉर्ड डेट कधी?

२० ऑगस्ट रोजी, कंपनीनं घोषणा केली की त्यांनी बोनस इक्विटी शेअर्ससाठी भागधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी गुरुवार, २८ ऑगस्ट ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. कंपनीनं एक्सचेंजला दिलेल्या सूचनेत म्हटलंय की, कंपनीने बोनस इक्विटी शेअर्ससाठी पात्र असलेल्या कंपनीच्या इक्विटी शेअर्स निश्चित करण्यासाठी गुरुवार, २८ ऑगस्ट २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड

जुलैमध्ये, कंपनीने घोषणा केली होती की बोर्डानं ५:८ च्या प्रमाणात इक्विटी शेअर्सच्या बोनस इश्यूला मान्यता दिली आहे. म्हणजेच, पात्र भागधारकांना रेकॉर्ड डेटवर प्रत्येक ५ इक्विटी शेअर्ससाठी ८ नवीन इक्विटी शेअर्स जारी केले जातील.

काय आहे सविस्तर माहिती

गेल्या पाच वर्षांत हा शेअर ४०० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या वर्षाच्या आर्थिक निकालांनुसार, बोनस शेअर्स जारी करण्यासाठी कंपनीच्या फ्री रिझर्व्ह आणि सिक्युरिटीज प्रीमियममधून निधी उभारला जाईल. या वाटपानंतर, कंपनीचे पेड-अप शेअर भांडवल ₹ ३.९८ कोटींवरून ₹ १०.३७ कोटींपर्यंत वाढेल.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: DMR Hydroengineering & Infrastructures company will give 8 bonus shares August 28 is the record date investors rush to buy shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.