Lokmat Money > बिझनेस न्यूज > DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी

DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी

DMR Hydroengineering & Infrastructures Bonus Shares: कंपनी बोनस म्हणून ८ नवीन शेअर्स देणार आहे. कंपनीनं सोमवारी यासंदर्भातील घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 11:05 IST2025-07-15T11:05:10+5:302025-07-15T11:05:10+5:30

DMR Hydroengineering & Infrastructures Bonus Shares: कंपनी बोनस म्हणून ८ नवीन शेअर्स देणार आहे. कंपनीनं सोमवारी यासंदर्भातील घोषणा केली.

DMR Hydroengineering and Infrastructures company will give 8 bonus shares on 5 Share price less than Rs 200 stock up more than 14 percent | DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी

DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी

DMR Hydroengineering & Infrastructures Bonus Shares: डीएमआर हायड्रोइंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेडनं (DMR Hydroengineering & Infrastructures) बोनस शेअर्सची घोषणा केली आहे. कंपनी बोनस म्हणून ८ नवीन शेअर्स देणार आहे. कंपनीनं सोमवारी यासंदर्भातील घोषणा केली. बोनस शेअर्सच्या बातमीचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर स्पष्टपणे दिसून आला. सोमवारी, डीएमआर हायड्रोइंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्सचे शेअर्स बीएसईवर १४.३१ टक्क्यांनी वाढून १७२.५० रुपयांवर बंद झाले. मात्र सोमवारी कामकाजादरम्यान त्यात घसरण दिसून आली.

सोमवारी, कंपनीनं एक्सचेंजला, गुंतवणूकदारांना प्रत्येक ५ शेअर्समागे ८ नवीन शेअर्स दिले जातील याची माहिती दिली. असं असलं तरी कंपनीनं सोमवारी या बोनस शेअरची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही.

'श्रीमंत' बनेल तुमचं मूल, या ६ मार्गांनी 'सुरक्षा कवच' तयार करा; महागाई देखील मार्ग अडवू शकणार नाही

शेअर बाजारातील एकूण कामगिरी कशी आहे?

गेल्या एका महिन्यात, डीएमआर हायड्रोइंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअर्सच्या किमतीत ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याच वेळी, या शेअरनं ३ महिन्यांत ५१ टक्क्यांचा परतावा दिलाय. दरम्यान, त्यानंतरही, एका वर्षात कंपनीनं पोझिशनल गुंतवणूकदारांना फक्त ४.३६ टक्के परतावा देऊ शकली आहे. त्याच कालावधीत, सेन्सेक्स निर्देशांकात २.१५ टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक २०८.४६ रुपये आहे आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १०९ रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप ६८.८१ कोटी रुपये आहे.

डीएमआर हायड्रोइंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअर्सच्या किमतीत २ वर्षात २८९ टक्के आणि ३ वर्षात ६२३ टक्के वाढ झाली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: DMR Hydroengineering and Infrastructures company will give 8 bonus shares on 5 Share price less than Rs 200 stock up more than 14 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.