Lokmat Money > बिझनेस न्यूज > Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट

Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट

Diwali Muhurat Trading 2025 Date and Time: यंदा वेळेत बदल करण्यात आलेला आहे, पाहा कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 10:51 IST2025-09-23T10:48:32+5:302025-09-23T10:51:12+5:30

Diwali Muhurat Trading 2025 Date and Time: यंदा वेळेत बदल करण्यात आलेला आहे, पाहा कधी होणार मुहूर्त ट्रेडिंग.

diwali laxmi pujan muhurat trading 2025 date time share bazar investment change this year | Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट

Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट

Diwali Muhurat Trading 2025 Date and Time: दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिवाळीच्या मुहूर्तावर शेअर बाजार उघडणार आहे. एनएसई (NSE) आणि बीएसईवर (BSE) २१ ऑक्टोबर २०२५ रोजी मुहूर्त ट्रेडिंग होईल. मात्र, यावेळी वेळेत बदल करण्यात आला आहे. यावेळी दुपारी १.४५ वाजता बाजार उघडेल आणि २.४५ वाजता बंद होईल. ट्रेडिंगमध्ये बदल करण्याची अंतिम वेळ १४:५५ वाजेपर्यंत असेल. मुहूर्त ट्रेडिंग हे दिवाळीच्या सणाचं आणि नवीन संवत २०८२ वर्षाच्या सुरुवातीचं प्रतीक आहे.

दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराला सुट्टी असते. पण, दरवर्षी या दिवशी एक तासासाठी बाजार उघडतो. याला मुहूर्त ट्रेडिंग म्हणतात. या वर्षी हे २१ ऑक्टोबर रोजी मुहूर्त ट्रेडिंग होणार आहे. या दिवशी दुपारी १.४५ वाजता बाजार उघडेल आणि २.४५ वाजता बंद होईल. साधारणपणे, यापूर्वी याचं आयोजन संध्याकाळी ६.१५ ते ७.१५ वाजेपर्यंत व्हायचं.

GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'

ट्रेडिंग रणनीतीचा महत्त्वाचा भाग 

मुहूर्त ट्रेडिंगला खूप खास मानलं जातं. लोकांचा असा विश्वास आहे की यामुळे सौभाग्य आणि समृद्धी येते. या वेळेत ट्रेडिंग सुरू केल्यानं वर्षभर सकारात्मक वातावरण राहतं. अनेक व्यापारी याला त्यांच्या ट्रेडिंग रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग मानतात.

गेल्या वर्षी मुहूर्त ट्रेडिंग १ नोव्हेंबर रोजी झालं होतं. त्या दिवशी बाजार मजबूत स्थितीत बंद झाला होता. सेन्सेक्स ३३५.०६ अंकांनी वाढला होता. ही ०.४२ टक्क्यांची वाढ होती. तो ७९,७२४.१२ अंकांवर बंद झाला होता. निफ्टी ९९ अंकांनी वाढला होता. ही ०.४१ टक्क्यांची वाढ होती. ५० शेअर्सचा हा इंडेक्स २४,३०४.३० वर बंद झाला होता. जवळपास २९०४ शेअर्समध्ये वाढ झाली होती. ५४० शेअर्समध्ये घट झाली होती, तर ७२ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नव्हता.

मुहूर्त ट्रेडिंगमागील मान्यता काय आहे?

आता जाणून घेऊया की मुहूर्त ट्रेडिंग का खास आहे. वास्तविक, हिंदू धर्मात दिवाळीचा दिवस खूप शुभ मानला जातो. हा सण समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक आहे. मुहूर्त ट्रेडिंग देखील याच मान्यतेवर आधारित आहे. असं मानले जाते की या दिवशी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास वर्षभर लाभ होतो.

मुहूर्त ट्रेडिंग एक प्रकारे शगुन मानलं जातं. लोक या दिवशी काही शेअर्स खरेदी करतात. यामुळे त्यांच्या गुंतवणुकीत वाढ होईल, असा त्यांचा विश्वास असतो. अनेक लोक या दिवशी नवीन खातीदेखील उघडतात.

Web Title: diwali laxmi pujan muhurat trading 2025 date time share bazar investment change this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.