Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Price Today: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक लागला आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 14:44 IST2025-11-19T14:43:54+5:302025-11-19T14:44:42+5:30

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक लागला आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी दिसून आली.

decline in gold and silver prices 19 november 2025 during the wedding season know new dates see the new price | Gold Silver Price Today: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत

Gold Silver Price Today: लग्नसराईच्या या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक लागला आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी दिसून आली.

आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,२६८ नं महाग होऊन ₹१,२३,४४८ प्रति १० ग्रॅम वर पोहोचलाय. जीएसटीसह १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ₹१,२७,१५१ पर्यंत गेलाय. तर, चांदीचा भाव जीएसटीसह ₹१,६०,९८९ प्रति किलो वर पोहोचला आहे. जीएसटीशिवाय चांदीचा दर आज ₹२,५९४ नं उसळून ₹१,५६,३०० प्रति किलो दराने उघडला.

मंगळवारी बाजार बंद झाला तेव्हा जीएसटीशिवाय चांदीचा भाव ₹१,५३,७०६ प्रति किलो आणि सोन्याचा भाव ₹१,२२,१८० प्रति १० ग्रॅम होता.

उच्चांकी दरापेक्षा अजूनही स्वस्त

सध्या सोन्याचा भाव १७ ऑक्टोबरच्या सर्वकालीन उच्चांकी दर ₹१,३०,८७४ पेक्षा ₹७,४२६ रुपयांनी स्वस्त आहे. तर, चांदीचे दर १४ ऑक्टोबरच्या उच्चांकी दर ₹१,७८,१०० पासून ₹२१,८०० रुपयांनी खाली आले आहेत.

कॅरेटनुसार सोन्याचे आजचे दर

२३ कॅरेट सोन्याचे दर आज ₹१,२६३ नं महाग होऊन ₹१,२२,९५४ प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. जीएसटीसह याची किंमत आता ₹१,२६,६४२ झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर ₹१,१६१ नं वाढून ₹१,१३,०७८ प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. जीएसटीसह हा दर ₹१,१६,४७० आहे.

१८ कॅरेट सोन्याचा दर ₹९५१ च्या तेजीसह ₹९२,५८६ प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. जीएसटीसह याची किंमत ₹९५,३६३ प्रति १० ग्रॅम आहे.

१४ कॅरेट सोन्याचा दरही ₹७४२ नं वाढला आहे. आज हा ₹७२,२१७ दरानं उघडला आणि जीएसटीसह ₹७४,३८३ वर आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) दिवसातून दोनदा दर जारी करते, एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि एकदा संध्याकाळी ५ च्या आसपास दर जारी केले जातात.

Web Title : सोने-चांदी की कीमतों में आज उछाल, गिरावट का सिलसिला थमा

Web Summary : लगातार गिरावट के बाद आज सोने और चांदी की कीमतों में उछाल आया। सोना ₹1,268 बढ़कर ₹1,23,448 प्रति 10 ग्राम हो गया, जबकि चांदी ₹2,594 बढ़कर ₹1,56,300 प्रति किलो (जीएसटी के बिना) हो गई। इस वृद्धि के बावजूद, कीमतें अभी भी सर्वकालिक उच्च स्तर से नीचे हैं।

Web Title : Gold, Silver Prices Rise Today, Breaking the Falling Trend

Web Summary : After a period of decline, gold and silver prices rebounded today. Gold surged by ₹1,268 to ₹1,23,448 per 10 grams, while silver jumped by ₹2,594 to ₹1,56,300 per kg (excluding GST). Despite the rise, prices remain below all-time highs.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.