देशात नागरिकांच्या हाताला काम मिळत असलं तरी ते त्यांच्या एकूण पगारातील ३९ टक्के रक्कम कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी, ३२ टक्के रक्कम रोजच्या आवश्यक खर्चासाठी आणि २९ टक्के रक्कम ही कपडे खरेदी, मनोरंजन तसेच इतर खर्चासाठी वापरली जात असल्याचं अहवालात समोर आलंय.
पीडब्ल्यूसी आणि पेर्फिओस ॲनॅलिसीसीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. मध्यम शहरांमध्ये टियर-२ शहरांमध्ये राहणारे लोक वैद्यकीय खर्चावर सरासरी सर्वाधिक पैसे म्हणजे २,४५० रुपये खर्च करतात. मात्र दुसरीकडे, महानगरांमध्ये वैद्यकीय खर्च सर्वात कमी असतो, येथे प्रतिव्यक्ती दरमहा सरासरी २,०४८ रुपये खर्च केले जातात. टियर-२ शहरांमध्ये घरभाड्यावर खर्च होणारा सरासरी एकूण खर्च टियर-१ शहरांपेक्षा ४.५ टक्के जास्त आहे.
खर्च नेमका कशावर?
बिलं ३०.१०%
खाणं-पिणं १७.४८%
घरभाडं १६.०४%
वैद्यकीय १४.५६%
इंधन १०.२०%
इतर खर्च ११.७२%
सध्या देशात बाहेरून (हॉटेल) जेवण मागविण्याचा ट्रेंडही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर समोर आले आहे.
देशात सहा वर्षांत (२०१९-२०२४) नोकरदारांचा पगार सरासरी ९.१ टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात स्वत:ची घरं घेण्याकडे पसंती दर्शविलीये. मात्र, २०२३ पासून भारतीयांच्या मालमत्तेत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ५० वर्षांतील ही नीचांकी पातळी आहे. सप्टेंबर २०२४ पर्यंत पर्सनल कर्जाची थकबाकी रक्कम तब्बल ५५.३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली असून, ही वाढ १३.७ टक्के आहे. शिवाय गृहकर्जाची एकूण थकबाकी २८.१ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
ईएमआय भरणाऱ्या लोकांची टक्केवारी
नवीन नोकरीला लागलेले ६९%
उदयोन्मुख व्यावसायिक ७२%
स्थिर स्थावर झालेले ७७%
उच्च उत्पन्न मिळविणारे ७९%
मनोरंजनासाठी किती खर्च?
‘ॲप’ने खरेदी ३१%
सामान्य २२%
ओटीटी २१%
चित्रपट १३%
केबल टीव्ही १२%
ऑडिओ १%