Post Office Dak Sewa App: पोस्ट ऑफिसनं देशभरातील युजर्ससाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. आता पोस्ट ऑफिसच्या बहुतेक सेवांसाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही. इंडिया पोस्टने आपले नवीन मोबाईल ॲप Dak Seva 2.0 लॉन्च केलं आहे, ज्याद्वारे आता मोबाईलवरूनच मनी ऑर्डर, पार्सल ट्रॅकिंग, विमा पेमेंट आणि इतर अनेक कामं करता येणार आहेत.
'आता खिशातच पोस्ट ऑफिस'
इंडिया पोस्टनं या ॲपची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरुन दिली. 'आता पॉकेटमध्ये मिळेल पोस्ट ऑफिस' म्हणजेच या ॲपद्वारे टपाल विभागाच्या आवश्यक सेवा एका क्लिकवर असतील. पार्सल पाठवायचं असो, विम्याचा प्रीमियम भरायचा असो किंवा स्पीड पोस्टचे शुल्क मोजायचं असो, सर्वकाही एकाच ॲपमध्ये शक्य होईल.
टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
Dak Seva 2.0 मधून काय-काय करू शकता?
Dak Seva 2.0 पूर्णपणे युजर-फ्रेंडली बनवलं गेलं आहे, जेणेकरून कोणतीही व्यक्ती सहजपणे त्याचा वापर करू शकेल. या ॲपद्वारे तुम्ही घरी बसून अनेक कामे करू शकता, जसं की –
पार्सल ट्रॅकिंग : कोणत्याही स्पीड पोस्ट किंवा पार्सलच्या डिलिव्हरीची स्थिती रिअल-टाइममध्ये ट्रॅक करू शकता.
मनी ऑर्डर : आता पोस्ट ऑफिसला जाण्याची गरज नाही, मोबाईलवरूनच मनी ऑर्डर पाठवली जाऊ शकते.
पोस्टल शुल्काचं कॅलक्युलेशन : स्पीड पोस्ट, रजिस्ट्री किंवा इतर सेवांचं शुल्क मोजलं जाऊ शकतं.
PLI/RPLI पेमेंट : पोस्टल लाइफ इन्शुरन्सचा प्रीमियमही याच ॲपमधून भरता येतो.
तक्रार करणंही झालं सोपं
जर कोणत्याही टपाल सेवेशी संबंधित तक्रार असेल, तर त्यासाठीही ॲपमध्ये Complaint Management System देण्यात आलं आहे. युजर्स आपली तक्रार नोंदवू शकतात आणि त्याच ॲपमध्ये तिचे स्टेटसही ट्रॅक करू शकतात. म्हणजेच, आता तक्रारी हरवणार नाहीत, सर्वकाही डिजिटल पद्धतीनं मॉनिटर केलं जाईल.
२३ भारतीय भाषांमध्ये मिळेल ॲपचा पर्याय
या ॲपची आणखी एक मोठी खासियत म्हणजे ते भारतातील विविध भाषांमध्ये वापरलं जाऊ शकतं. यामध्ये २३ भारतीय भाषांचे सपोर्ट देण्यात आले आहे, ज्यात हिंदी, इंग्रजी, बंगाली, मराठी, तमिळ आणि गुजराती यांसारख्या प्रमुख भाषांचा समावेश आहे. भाषा बदलण्याचा पर्याय ॲपच्या वरच्या बाजूस (Top) उपलब्ध आहे, ज्यामुळे प्रत्येक राज्यातील लोक सहजपणे त्यांच्या आवडीच्या भाषेत याचा वापर करू शकतात.
बँकिंग सेवांपर्यंतही सोपी पोहोच
ज्या लोकांचे पोस्ट ऑफिस बचत खातं आहे, ते देखील या ॲपद्वारे आपल्या खात्याची माहिती पाहू शकतात. खात्यातील शिल्लक, व्यवहार आणि इतर तपशील काही क्लिकमध्ये ॲक्सेस केले जाऊ शकतात. याव्यतिरिक्त, ॲपमध्ये प्रोफाइल बनवून आपल्या सर्व पोस्टल ॲक्टिव्हिटीजला एकाच ठिकाणाहून ट्रॅक करण्याची सोय मिळते.
अँड्रॉइड आणि iOS दोन्हीवर उपलब्ध
Dak Seva 2.0 ॲप अँड्रॉइड आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी जारी करण्यात आले आहे. याचं इंटरफेस खूप साधं आणि स्वच्छ आहे, जेणेकरून प्रत्येक वयोगटातील लोक ते सहजपणे वापरू शकतील.
