Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात ३% वाढीची शक्यता; तुमच्या पगारात किती वाढ होणार?

सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात ३% वाढीची शक्यता; तुमच्या पगारात किती वाढ होणार?

DA Hike Update : केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक आनंदाची बातमी लवकरच येत आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर, महागाई भत्त्यातील वाढीबाबतची घोषणा या आठवड्यात केली जाण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 15:39 IST2026-04-02T14:42:35+5:302026-04-02T15:39:33+5:30

DA Hike Update : केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक आनंदाची बातमी लवकरच येत आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर, महागाई भत्त्यातील वाढीबाबतची घोषणा या आठवड्यात केली जाण्याची शक्यता आहे.

DA Hike News 2026 Central Govt Employees to Get 3% Dearness Allowance Increase Soon | सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात ३% वाढीची शक्यता; तुमच्या पगारात किती वाढ होणार?

सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात ३% वाढीची शक्यता; तुमच्या पगारात किती वाढ होणार?

DA Hike Update : केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महागाई भत्त्यातील वाढीची घोषणा केंद्र सरकार याच आठवड्यात करण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयामुळे सुमारे ४९ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे.

आता ६१% मिळणार 'डीए'
मीडिया रिपोर्टसनुसार, सरकार यावेळी महागाई भत्त्यात ३ टक्क्यांची वाढ करू शकते. सध्या हा भत्ता ५८% आहे, जो वाढून आता ६१% होईल. ऑक्टोबर २०२५ मध्ये महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के करण्यात आला होता, जो १ जुलै २०२५ पासून लागू झाला होता. वाढत्या महागाईचा कर्मचाऱ्यांच्या क्रयक्षमतेवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सरकार वर्षातून दोनदा (जानेवारी आणि जुलै) या भत्त्यात सुधारणा करते.

तुमच्या पगारात किती वाढ होईल? (गणिताचा आढावा)
महागाई भत्ता वाढल्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारावर होईल. एका उदाहरणावरून हे समजून घेऊया.

  • मूळ पगार : समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार ५६,१०० रुपये आहे.
  • ५८% डीए नुसार: आतापर्यंत त्यांना ३२,५३८ रुपये मिळत होते.
  • ६१% डीए नुसार: आता ही रक्कम ३४,२२१ रुपये होईल.
  • निव्वळ वाढ: दरमहा सुमारे १,६८३ रुपयांची वाढ.

एरिअरसह मिळणार मोठी रक्कम!
केवळ पगारवाढच नाही, तर कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांचा एरिअर (थकीत रक्कम) देखील मिळण्याची शक्यता आहे. वरील उदाहरणातील कर्मचाऱ्याला एप्रिलच्या पगारासोबत सुमारे ६,७३२ रुपये अतिरिक्त मिळू शकतात. अर्थात, ही रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मूळ पगारावर अवलंबून असेल.

वाचा - LIC च्या पैशांवर 'रिलायन्स'चा डल्ला? सीबीआयकडून अनिल अंबानींविरोधात चौथा खटला दाखल

८ व्या वेतन आयोगाबाबत काय आहे स्थिती?
कर्मचाऱ्यांचे लक्ष ८ व्या वेतन आयोगाकडे लागले आहे. नियमानुसार हा आयोग १ जानेवारी २०२६ पासून लागू होणे अपेक्षित होते. मात्र, ताज्या माहितीनुसार, या प्रक्रियेला विलंब होत असून तो २०२७ च्या मध्यापर्यंत लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत, सध्याची महागाई भत्ता वाढ हीच कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

Web Title : सरकारी कर्मचारियों के लिए खुशखबरी! महंगाई भत्ते में 3% की बढ़ोतरी संभव

Web Summary : केंद्र सरकार के कर्मचारियों के महंगाई भत्ते में 3% की बढ़ोतरी हो सकती है, जिससे यह 61% तक पहुंच जाएगा। इस वृद्धि से लाखों कर्मचारियों और पेंशनभोगियों के वेतन और पेंशन में वृद्धि होगी, साथ ही बकाया राशि का भुगतान भी किया जा सकता है। 8वें वेतन आयोग के लागू होने में देरी हो सकती है।

Web Title : Govt Employees to Get 3% DA Hike; Salary Increase Details

Web Summary : Central government employees may see a 3% DA hike, raising it to 61%. This increase will significantly boost salaries and pensions for millions, with potential arrears paid. The 8th Pay Commission implementation is likely delayed until mid-2027.