Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला

Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला

Crude Oil: इराणमधून भारताकडे येत असलेला कच्च्या तेलाचा टँकर अचानक चीनच्या दिशेने वळला आहे. जर हे जहाज भारतात पोहोचलं असतं, तर गेल्या ७ वर्षांत इराणमधून भारतात आलेली ही पहिलीच तेलाची खेप ठरली असती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 13:56 IST2026-04-03T13:54:30+5:302026-04-03T13:56:49+5:30

Crude Oil: इराणमधून भारताकडे येत असलेला कच्च्या तेलाचा टँकर अचानक चीनच्या दिशेने वळला आहे. जर हे जहाज भारतात पोहोचलं असतं, तर गेल्या ७ वर्षांत इराणमधून भारतात आलेली ही पहिलीच तेलाची खेप ठरली असती.

Crude Oil price hike Iranian crude oil tanker diverted to China instead of India Ship heading to Gujarat changed course | Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला

Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला

Crude Oil: इराणमधून भारताकडे येत असलेला कच्च्या तेलाचा टँकर अचानक चीनच्या दिशेने वळला आहे. 'ब्लूमबर्ग'च्या अहवालानुसार, जर हे जहाज भारतात पोहोचलं असतं, तर गेल्या ७ वर्षांत इराणमधून भारतात आलेली ही पहिलीच तेलाची खेप ठरली असती. मात्र, आता या जहाजानं आपला रस्ता बदलला असून हे टँकर नेमके कुठे पोहोचणार, याबाबत अद्याप पूर्ण स्पष्टता नाही.

काय आहे नेमकं प्रकरण?

'पिंग शुन' (Ping Shun) नावाचं हे अफ्रामॅक्स जहाज २००२ मध्ये तयार झालं असून अमेरिकेनं २०२५ मध्ये यावर बंदी घातली होती. 'केप्लर' या शिप ट्रॅकिंग फर्मच्या माहितीनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला जहाजानं गुजरातच्या वाडिनार बंदरात पोहोचण्याचे संकेत दिले होते. परंतु अचानक मार्ग बदलून आता हे जहाज चीनच्या डोंगयिंगकडे सरकत आहे. या टँकरनं मार्चच्या सुरुवातीला इराणच्या खार्ग बेटावरून कच्चं तेल लोड केलं होतं.

HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?

भारतासमोरील अडचणीत वाढ

पश्चिम आशियातील संकटामुळे भारत सध्या कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. इराणनं हल्ल्यामुळे होर्मुजच्या सामुद्रधुनीवर नाकेबंदी केलीये. दरम्यान, अमेरिकेनं गेल्या महिन्यात समुद्रात असलेल्या इराणी तेल जहाजांसाठी तात्पुरती सूट दिली होती, तरीही भारतीय सरकारी कंपन्यांनी त्यांच्यापासून अंतर राखलं आहे.

टँकर भारताऐवजी चीनकडे का वळला?

पेमेंटमधील अडथळे: अमेरिकन डॉलरमध्ये पेमेंट करणाऱ्या मध्यस्थ बँकांनी इराणी संस्थांसोबत व्यवहार करण्यास नकार दिला आहे.
विमा आणि कागदपत्रे: अमेरिकन बंदीमुळे इराणी जहाजांसाठी विमा आणि शिपिंगची कागदपत्रं तयार करणं अत्यंत क्लिष्ट झालंय.
अनलोडिंगची समस्या: भारतानं मे २०१९ पासून इराणकडून तेल खरेदी बंद केली होती. अलीकडेच 'सी बर्ड' नावाचं जहाज इराणी एलपीजी घेऊन ३० मार्चला मंगळुरूमध्ये पोहोचलं होतं, परंतु पेमेंटमधील अडचणींमुळे ते अद्याप अनलोड होऊ शकलेलं नाही.

चीनचा फायदा

इतर देशांकडून तेल खरेदी करताना भारत सध्या खूप खबरदारी घेत आहे, तसंच पेमेंटशी संबंधित अनेक समस्या येत आहेत. दुसरीकडे, चीन हा इराणी तेलाचा प्रमुख खरेदीदार राहिलाय. 'पिंग शुन' सारख्या जहाजांसाठी चीनमध्ये पेमेंट आणि वितरणाची स्वतंत्र व्यवस्था असल्यानं ही तेलाची खेप भारताऐवजी आता चीनकडे जात आहे.

Web Title : ईरान का तेल टैंकर भारत को छोड़ चीन की ओर मुड़ा

Web Summary : भारत आ रहा ईरानी तेल टैंकर चीन की ओर मुड़ गया, जिससे 7 साल का अंतराल खत्म हो सकता था। भुगतान समस्या, बीमा जटिलताओं और भारत में उतराई की समस्याओं ने बदलाव को प्रेरित किया। चीन ईरानी तेल का प्रमुख खरीदार बना हुआ है, जो सुचारू लेनदेन की सुविधा प्रदान करता है।

Web Title : Iran's oil tanker diverts to China, bypassing India

Web Summary : An Iranian oil tanker bound for India diverted to China, potentially ending a 7-year gap. Payment issues, insurance complexities, and unloading problems in India prompted the change. China remains a major buyer of Iranian oil, facilitating smoother transactions.