Lokmat Money > बिझनेस न्यूज > Credit Card : क्रेडिट कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी! एक चूक तुम्हाला रस्त्यावर आणेल, सायबर गुन्हेगारांचा नवा फ्रॉड

Credit Card : क्रेडिट कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी! एक चूक तुम्हाला रस्त्यावर आणेल, सायबर गुन्हेगारांचा नवा फ्रॉड

Credit Card : तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमचे लाखो रुपये वाचवू शकते. सायबर गुन्हेगारांनी लोकांना फसवण्यासाठी नवा मार्ग शोधून काढला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 14:30 IST2024-12-17T14:30:03+5:302024-12-17T14:30:56+5:30

Credit Card : तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमचे लाखो रुपये वाचवू शकते. सायबर गुन्हेगारांनी लोकांना फसवण्यासाठी नवा मार्ग शोधून काढला आहे.

credit card users should be cautious scammers are cheating in the name of increasing limit | Credit Card : क्रेडिट कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी! एक चूक तुम्हाला रस्त्यावर आणेल, सायबर गुन्हेगारांचा नवा फ्रॉड

Credit Card : क्रेडिट कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी! एक चूक तुम्हाला रस्त्यावर आणेल, सायबर गुन्हेगारांचा नवा फ्रॉड

Credit Card : आजच्या डिजिटल युगात रोखीने होणारे व्यवहारांचं प्रमाण खूप कमी झालंय. सध्या ऑनलाईन आणि क्रेडिट कार्डचा जमाना आला आहे. अनेक बँका आणि वित्तीय संस्था क्रेडिट कार्डवर भरघोस ऑफर्स आणि सूट देत असल्याने अनेकजण त्याचा वापर करतात. तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर सावध होण्याची गरज आहे. कारण, तुमच्यासोबतही हा फ्रॉ होऊ शकतो. नोएडा पोलिसांनी क्रेडिट कार्डधारकांची फसवणूक करणाऱ्या ६ आरोपींना अटक केली आहे.

आरोपींची ही टोळी बँकेचे अधिकारी असल्याचे भासवून लोकांची आर्थिक फसवणूक करत होते. क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवण्याचे आश्वासन देऊन लोकांची बँक खाती रिकामी केली जात. आरोपी अतिशय हुशारीने क्रेडिट कार्डधारकांची संवेदनशील माहिती मिळवून त्यांच्याकडून लाखो रुपयांची उकळत होते. तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरणारे असाल, तर यांची फसवणूक करण्याची पद्धत माहिती असणे आवश्यक आहे.

गुन्हेगार क्रेडिट कार्डधारकांना फोन करुन बँक अधिकारी असल्याचे भासवायचे. त्यांची क्रेडिट मर्यादा वाढवण्याची ऑफर दिली जात. ग्राहकाचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याची सर्व माहिती जसे की पत्ता, फोन नंबर, बँक खात्याचा नंबर अशी माहिती सांगितली जात. अचूक माहिती ऐकून ग्राहकांचा विश्वास बसे. त्यानंतर ओटीपीची मागणी करुन बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर केले जात.

फिशिंग लिंक्सद्वारे ग्राहकांना अडकवत
ग्राहकांना जाळ्यात ओढण्यासाठी ते पीडितांना फिशिंग लिंक पाठवत असत जे त्यांना बनावट वेबसाइटवर घेऊन जात. ही वेबसाइट अगदी बँक पोर्टलसारखी दिसते. कारण, ती त्याच कामासाठी तयार करण्यात आली आहे. या फसव्या साइट्सला भेट दिल्यानंतर कार्डधारकाला अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. अ‍ॅप नंतर त्यांना संवेदनशील माहिती प्रविष्ट करण्यास सांगतात, ज्यामध्ये त्यांचे क्रेडिट कार्ड क्रमांक, ईमेल पत्ते, पॅन आणि आधार कार्डचा तपशील मागितला जातो. वर्तमान क्रेडिट मर्यादा, एक्सपायरी डेट आणि CVV क्रमांक याचा समावेश होता.

महागड्या वस्तू ऑनलाइन खरेदी करत
क्रेडिट कार्डधारकाने आपली संपूर्ण माहिती या अ‍ॅपमध्ये टाकताच. गुन्हेगार ती माहिती आणि OTP ऑनलाइन खरेदीसाठी वापरत होते. ई कॉमर्स वेबसाईट्सवरुन महागडे मोबाईल, सोन्या-चांदीची नाणी अशा गोष्टी खरेदी केल्या जात. पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती, त्यानंतर पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे.

Web Title: credit card users should be cautious scammers are cheating in the name of increasing limit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.