lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशातील विजेची मागणी आतापर्यंतच्या उच्चांकावर; उत्तरेतील तापमानवाढीचा परिणाम

देशातील विजेची मागणी आतापर्यंतच्या उच्चांकावर; उत्तरेतील तापमानवाढीचा परिणाम

ऊर्जा मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, बुधवारी देशातील विजेची मागणी २००.५७ गिगा वॉट झाली. त्याआधीच्या दिवशी म्हणजे  मंगळवारी ती १९७.०७ गिगा वॉट होती. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 11:44 AM2021-07-10T11:44:47+5:302021-07-10T11:45:30+5:30

ऊर्जा मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, बुधवारी देशातील विजेची मागणी २००.५७ गिगा वॉट झाली. त्याआधीच्या दिवशी म्हणजे  मंगळवारी ती १९७.०७ गिगा वॉट होती. 

The country's electricity demand is at an all-time high; The effect of warming in the north | देशातील विजेची मागणी आतापर्यंतच्या उच्चांकावर; उत्तरेतील तापमानवाढीचा परिणाम

देशातील विजेची मागणी आतापर्यंतच्या उच्चांकावर; उत्तरेतील तापमानवाढीचा परिणाम

नवी दिल्ली: भारतातील विजेची मागणी आतापर्यंतची सर्वोच्च म्हणजे २०० गिगा वॉटपेक्षा अधिक झाली असून, हा सार्वकालिक उच्चांक ठरला आहे. मान्सून लांबल्यामुळे अनेक राज्यांत वाढलेले तापमान आणि कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे शिथिल करण्यात आलेले निर्बंध यामुळे विजेच्या मागणीत विक्रमी वाढ झाल्याचे सांगण्यात आले.

ऊर्जा मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, बुधवारी देशातील विजेची मागणी २००.५७ गिगा वॉट झाली. त्याआधीच्या दिवशी म्हणजे  मंगळवारी ती १९७.०७ गिगा वॉट होती. सूत्रांनी सांगितले की, तापमान वाढल्यामुळे पंखे, एसी, फ्रीजसह इतर घरगुती उपकरणांचा वापर वाढला आहे. त्याचप्रमाणे कोविड-१९चे निर्बंध शिथिल झाल्याने उद्योग-व्यवसाय पुन्हा सुरू झाले आहेत. त्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. 

केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंग यांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, सकाळी ११.४३ वा. विजेची सर्वोच्च मागणी १,९७,०६० मेगावॉट झाली. मागणीच्या वाढीची गती अशीच कायम राहिल्यास लवकरच ती २,००,००० मेगावॉट होऊ शकते. जानेवारीमध्ये केलेल्या एका ट्विटमध्येही सिंग यांनी विजेची          मागणी लवकरच २,००,००० मेगावॉटवर जाईल असे म्हटले होते. त्यांनी हे ट्विट केले तेव्हा विजेची सर्वोच्च मागणी १,८८,४५२ मेगावॉट होती.

आधीचा विक्रम १९१ गिगा वॉटचा
गेल्या महिन्यात दिवसाची वीज मागणी १६ टक्क्यांनी वाढून १९१.५१ गिगा वॉट (३० जून रोजी) झाली होती. जून २०२० मधील सर्वोच्च मागणी १६४.९८ गिगा वॉट इतकी होती. जून २०१९मधील सर्वोच्च वीज मागणी १८२.४५ गिगा वॉट होती. ५ जुलै २०२१ रोजी विजेची मागणी १९२.१६ गिगा वॉट होती.
 

Web Title: The country's electricity demand is at an all-time high; The effect of warming in the north

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.