lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > कंपन्यांमधील नोकऱ्या घटल्या, फ्रीलान्स काम करणाऱ्यांमध्ये तब्बल १८४ टक्के वाढ

कंपन्यांमधील नोकऱ्या घटल्या, फ्रीलान्स काम करणाऱ्यांमध्ये तब्बल १८४ टक्के वाढ

Jobs Down: भारतातील कंपन्यांनी चालू वर्षातील मार्च महिन्यात केलेल्या भरतीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत चार टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात भरतीमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 06:26 AM2024-04-03T06:26:00+5:302024-04-03T06:26:49+5:30

Jobs Down: भारतातील कंपन्यांनी चालू वर्षातील मार्च महिन्यात केलेल्या भरतीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत चार टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात भरतीमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Corporate jobs down, freelancers up 184 percent | कंपन्यांमधील नोकऱ्या घटल्या, फ्रीलान्स काम करणाऱ्यांमध्ये तब्बल १८४ टक्के वाढ

कंपन्यांमधील नोकऱ्या घटल्या, फ्रीलान्स काम करणाऱ्यांमध्ये तब्बल १८४ टक्के वाढ

मुंबई  - भारतातील कंपन्यांनी चालू वर्षातील मार्च महिन्यात केलेल्या भरतीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत चार टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र फेब्रुवारीच्या तुलनेत मार्च महिन्यात भरतीमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘फाउंडिट इनसाइट्स ट्रॅकर’ (एफआयटी) या संस्थेने मंगळवारी सादर केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

या अहवालासाठी मार्च २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत संकलित केलेल्या माहितीचा आधार घेतला आहे. ग्राहकांना पुरविलेल्या तात्पुरत्या सेवांचे पुरवठादार आणि फ्रीलान्स काम करणाऱ्यांमध्ये वर्षभरात तब्बल १८४ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निरीक्षण यात नोंदवण्यात आले आहे.

आयटीने दिल्या सर्वाधिक रोजगाराच्या संधी
कामाच्या बदल्यात वेतन घेणाऱ्या कामगारांना सामावून घेण्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रही आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. २०२३ मध्ये या क्षेत्राचा वाटा २२ टक्के इतका असलेला वाटा २०२४ मध्ये ४५ टक्क्यांवर पोहोचला आहे, असेही या अहवालात म्हटले आहे. अशा पद्धतीच्या कामांची संधी देण्यात दिल्ली, मुंबई, बंगळुरुसारखी शहरे आघाडीवर आहेत.

तात्पुरते कामगार २१ टक्के वाढले
- सध्याच्या व्यावसायिकांची पसंती प्रकल्प आधारित कामांनी अधिक असल्याचे दिसत आहे. यात स्वतंत्रपणे काम करणारे वकील, शिक्षक, लेखापाल, व्यवस्थापन सल्लागार आदींचा समावेश आहे. 
- एकूण कार्यबलामध्ये तात्पुरत्या कामगारांची भूमिका नेहमी महत्त्वाची असते. अशा कामगारांचे प्रमाण वर्षभरात २१ टक्क्यांनी वाढले असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. 
- अनेक व्यवसायांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी कंत्राटदार या तात्पुरत्या कामगारांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात.

Web Title: Corporate jobs down, freelancers up 184 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.