पुणे : वास्तविक कुंभमेळ्यातील आणि निवडणूक प्रचारांतील लाखोंची गर्दी पाहता उत्तरराखंड आणि पश्चिम बंगालमध्ये दुसरी लाट यायला हवी होती. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई, राजधानी दिल्ली आणि टेकनगरी बंगळुरू येथेच कोरोनाची दुसरी लाट का आली, असा सवाल करत कोरोना हे चीन आणि पाकिस्तानचे कटकारस्थान आहे, असा आरोप ज्येेष्ठ उद्योगपती अरुण फिरोदिया यांनी केला आहे. यासाठी चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
फिरोदिया म्हणाले, कोरोना चीन आणि पाकिस्तानने पसरविला आहे यामध्ये काहीच शंका नाही. याचे कारण म्हणजे भारताने लडाखमध्ये चीनला चोख उत्तर दिले. त्यामुळे त्यांनी भारतीयांविरोधात कोरोनाच्या शस्त्राचा वापर केला. याविरोधात आपण एकच करू शकतो की चिनी उत्पादने खरेदी करणे थांबवू शकतो. ‘क्वाड’ देशांचा समूह आणि जगातील इतर लोकशाही देशांना सांगायला हवे की आता त्यांचा नंबर आहे. त्यामुळे त्यांनीही चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकावा हे समजावून सांगावे लागेल.
इतर देशांना आपले उद्योग चीनच्या बाहेर नेण्यास प्रवृत्त करावे लागेल. चीनला धडा शिकवण्यासाठी केवळ हेच करणे पुरेसे नाही. परंतु, त्यामुळे किमान निषेधाची सुरूवात होईल.
Coronavirus: चीनमधील उत्पादनांवर बहिष्कार टाका, अरुण फिरोदिया यांचं आवाहन
Coronavirus: भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई, राजधानी दिल्ली आणि टेकनगरी बंगळुरू येथेच कोरोनाची दुसरी लाट का आली, असा सवाल करत कोरोना हे चीन आणि पाकिस्तानचे कटकारस्थान आहे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 11:32 IST2021-05-26T11:31:56+5:302021-05-26T11:32:58+5:30
Coronavirus: भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई, राजधानी दिल्ली आणि टेकनगरी बंगळुरू येथेच कोरोनाची दुसरी लाट का आली, असा सवाल करत कोरोना हे चीन आणि पाकिस्तानचे कटकारस्थान आहे
