lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Reliance Jio शी स्पर्धा, Airtel नं आणला १०० रुपयांपेक्षाही स्वस्तातील प्रीपेड प्लॅन; मिळणार अनेक फायदे

Reliance Jio शी स्पर्धा, Airtel नं आणला १०० रुपयांपेक्षाही स्वस्तातील प्रीपेड प्लॅन; मिळणार अनेक फायदे

कंपनीनं लाँच केला नवा प्लॅन.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 03:25 PM2021-12-23T15:25:06+5:302021-12-23T15:25:21+5:30

कंपनीनं लाँच केला नवा प्लॅन.

Competition with Reliance Jio, Airtel No. Prepaid plan cheaper than Rs. 100; There are many benefits | Reliance Jio शी स्पर्धा, Airtel नं आणला १०० रुपयांपेक्षाही स्वस्तातील प्रीपेड प्लॅन; मिळणार अनेक फायदे

Reliance Jio शी स्पर्धा, Airtel नं आणला १०० रुपयांपेक्षाही स्वस्तातील प्रीपेड प्लॅन; मिळणार अनेक फायदे

भारतातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेल (Bharti Airtel) आपल्या ग्राहकांना एक सर्वात स्वस्त SMS बंडल प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे. दरवाढीनंतर एसएमएस बंडल प्रीपेड प्लॅन्सची किंमतही अतिशय वाढली आहे. यानंतर 1900 या क्रमांकावरही पोर्ट आऊटसाठी मोफत एसएमएस पाठवण्याची सुविधा दिली पाहिजे असं ट्रायनं म्हटलं होतं. तसंच तो प्लॅन एसएमएसच्या सकट असेल किंवा नसेल असंही ट्रायनं स्पष्ट केलं होतं. दरम्यान आता एसएमएस बंडल प्रीपेड प्लॅन कमी किंमतीत ऑफर करणारी भारती एअरटेल ही कंपनी आहे. यापूर्वी जिओ सर्वात कमी किंमतीत या सुविधा देत होतं. 

Airtel Rs 99 Plan Offering SMS Benefits
एअरटेलचा 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ग्राहकांना एसएमएसचे फायदे देत आहे. 99 रुपयांच्या प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा आणि व्हॉइस कॉलिंगसारखे फायदे उपलब्ध नाहीत. परंतु ग्राहकांना 99 रुपये टॉकटाइम, 200 एमबी डेटा, कॉलसाठी 1 पैसे प्रति सेकंद आणि स्थानिक एसएमएससाठी 1 रुपये, तर एसटीडी एसएमएससाठी 1.5 रुपये शुल्क आकारले जाईल. या प्लॅनची ​​एकूण वैधता 28 दिवसांची आहे.

जिओचा प्लॅन एअरटेलच्या प्लॅनपेक्षा 20 रुपये अधिक महाग आहे, पण त्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड बेनिफिट्सही देण्यात येतात. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1.5GB डेटा प्रति दिवस, 300 SMS आणि 14 दिवसांसाठी अमर्यादित व्हॉइस कॉलिंग सुविधा मिळते. तसेच यात JioCinema, JioTV, JioCloud आणि JioSecurity Suite चे सबस्क्रिप्शनही देण्यात येते. भारती एअरटेलचा 99 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ग्राहकांना एसएमएसचा लाभ देणारा सर्वात स्वस्त प्लॅन आहे. यात एअरटेल थँक्सचे फायदे नसले तरीही ग्राहकांना व्हॉइस कॉलिंग, डेटा आणि एसएमएसचे फायदे मिळतात.

Web Title: Competition with Reliance Jio, Airtel No. Prepaid plan cheaper than Rs. 100; There are many benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.