Lokmat Money > बिझनेस न्यूज > द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?

द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?

colonel sophia qureshi : ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्यातील २ महिला अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले आहेत. त्यापैकी एक कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसरी विंग कमांडर व्योमिका सिंग आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 10:45 IST2025-05-08T10:20:05+5:302025-05-08T10:45:58+5:30

colonel sophia qureshi : ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्यातील २ महिला अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले आहेत. त्यापैकी एक कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसरी विंग कमांडर व्योमिका सिंग आहे.

colonel sophia qureshi salary and education know all details | द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?

द्वेषाचं बीज उखडून फेकणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा पगार किती? कुठून घेतलं शिक्षण? काय मिळतात सुविधा?

colonel sophia qureshi : सध्या जगभरात भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर'ची चर्चा आहे. पहलगाम हल्ल्याच्या माध्यमातून दहशतवाद्यांनी देशात हिंदू-मुस्लिम द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्याने यावेळी फक्त एअर स्ट्राईक केला नाही. तर द्वेषाचं बीज उखडून फेकण्यात यश मिळवलं आहे. यासाठी महत्त्वाची ठरली ती म्हणजे 'ऑपरेशन सिंदूर'नंतरची पत्रकार परिषद. यामध्ये लष्कराच्या २ महिलांना अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. त्यापैकी एक कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसरी विंग कमांडर व्योमिका सिंग आहे. आज आम्ही तुम्हाला देशातील महिला शक्तीचे प्रतीक असलेल्या सोफिया कुरेशी यांच्याबाबत माहिती सांगणार आहोत. त्या या पदापर्यंत कशा पोहचल्या? त्यांचं शिक्षण कुठे झाले? त्यांना किती पगार मिळतो? सुविधांचं काय?

गुजरातमध्ये सोफिया कुरेशी यांचा जन्म
कर्नल सोफिया कुरेशी यांचा जन्म १९८१ मध्ये गुजरातमधील वडोदरा येथे झाला. त्यांनी गुजरातमधूनच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर १९९९ मध्ये, सोफिया यांनी चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण घेतले. त्याच वर्षी त्यांना लेफ्टनंट म्हणून नियुक्ती मिळाली, त्यानंतर सोफिया यांनी मागे वळून पाहिलं नाही. सोफिया यांनी २००६ मध्ये, काँगोमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत लष्करी निरीक्षक म्हणून काम केले. तर २०१० मध्ये, सोफिया शांतता निर्माण मोहिमांशी संबंधित राहिली आहे.

सोफिया यांचा पगार आणि सुविधा किती?
कर्नल पदावर काम करणाऱ्या सोफिया कुरेशी यांचा दरमहा पगार १,२१,२०० ते २,१२,४०० रुपयांच्या दरम्यान असू शकतो. पगाराव्यतिरिक्त, त्यांना इतर अनेक प्रकारचे भत्ते देखील मिळतात. यामध्ये त्यांना दरमहा लष्करी सेवेचा भत्ता म्हणून १५,५०० रुपये मिळतात. याशिवाय, लष्करी जवान म्हणून त्यांना घरभाडे भत्ता, फील्ड एरिया भत्ता, वाहतूक भत्ता देखील मिळतो. यासोबतच, लष्करी कर्मचाऱ्यांना गणवेश भत्त्याअंतर्गत २०,००० रुपये देखील दिले जातात.

वाचा - भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?

कसे झाले ऑपरेशन सिंदूर?
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत, भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. या ऑपरेशनबाबत पत्रकार परिषदेत दोन महिलांनी भाग घेतला. या कारवाईत जवळपास ९० दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूरमध्ये असलेलं जैश-ए-मोहम्मदचं मुख्यालय भारतीय सैन्यानं जमीनदोस्त केलं. मुरिदकेमधील लष्कर-ए-तय्यबाचं मुख्यालयावर क्षेपणास्त्रं डागण्यात आली. २०१६ आणि २०१९ मध्ये भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ले केले होते. पण यावेळी थेट पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याची धाडसी कामगिरी भारतीय सैन्यानं करुन दाखवली आहे.
 

Web Title: colonel sophia qureshi salary and education know all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.