Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

Colab Platforms Stock Price: शेअर्सना सलग ७३ व्या दिवशी अपर सर्किट लागलं. बाजारातील कमजोर भावना असतानाही, या कंपनीच्या शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीनं आपल्या भागधारकांना बोनस शेअरचेही गिफ्ट दिले आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 17:10 IST2025-09-30T17:09:45+5:302025-09-30T17:10:45+5:30

Colab Platforms Stock Price: शेअर्सना सलग ७३ व्या दिवशी अपर सर्किट लागलं. बाजारातील कमजोर भावना असतानाही, या कंपनीच्या शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीनं आपल्या भागधारकांना बोनस शेअरचेही गिफ्ट दिले आहे

colab platforms share price upper circuit 73 days multibagger stock details | Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल

Colab Platforms Stock Price: पेनी स्टॉक कोलॅब प्लॅटफॉर्म्स (Colab Platforms) सातत्यानं रॉकेट बनला आहे. या मल्टीबॅगर कंपनीचे शेअर्स मंगळवारी २ टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह ₹१२५.१४ वर पोहोचले. कोलॅब प्लॅटफॉर्म्सच्या शेअर्सना सलग ७३ व्या दिवशी अपर सर्किट लागलं. बाजारातील कमजोर भावना असतानाही, कोलॅब प्लॅटफॉर्म्सच्या शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीने आपल्या भागधारकांना बोनस शेअरचेही गिफ्ट दिलं आहे, तसंच दोन वेळा स्टॉक स्प्लिट (शेअरचे विभाजन) केलं आहे.

१ वर्षात ८४२% वाढ

कोलॅब प्लॅटफॉर्म्सचे शेअर्स गेल्या एका वर्षात ८४२ टक्के वाढले आहेत. ३० सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीचे शेअर्स ₹१३.२८ वर होते, ते ३० सप्टेंबर २०२५ रोजी ₹१२५.१४ वर पोहोचले आहेत. मंगळवारी कंपनीच्या शेअर्सनी आपला ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. या वर्षात आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ३०५ टक्क्यांची तेजी दिसून आली. या वर्षाच्या सुरुवातीला, १ जानेवारी २०२५ रोजी कोलॅब प्लॅटफॉर्म्सचे शेअर्स ₹३०.८९ वर होते, ते ३० सप्टेंबर २०२५ रोजी ₹१२५ च्या वर गेले आहेत. गेल्या एका महिन्याचा विचार केल्यास, कोलॅब प्लॅटफॉर्म्सच्या शेअर्समध्ये ५१ टक्क्यांची वाढ झाली.

उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट

बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिट

कोलॅब प्लॅटफॉर्म्सनं आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर वाटप केलं आहे. या मल्टीबॅगर कंपनीने मार्च २०१४ मध्ये १:१ या प्रमाणात बोनस शेअर दिला होता, म्हणजेच प्रत्येक १ शेअरवर १ बोनस शेअर दिला. याशिवाय, कोलॅब प्लॅटफॉर्म्सने दोन वेळा आपल्या शेअरचे विभाजन (स्टॉक स्प्लिट) केलं आहे. कंपनीने मार्च २०२४ मध्ये आपले शेअर्स ५ भागांमध्ये विभाजित केले. ₹१० फेस व्हॅल्यूचा शेअर ₹२ फेस व्हॅल्यू असलेल्या ५ शेअर्समध्ये विभागला गेला. त्यानंतर, मे २०२५ मध्ये कोलॅब प्लॅटफॉर्म्सनं पुन्हा आपल्या शेअरचे विभाजन २ भागात केलं. यावेळी, ₹२ फेस व्हॅल्यूचा शेअर ₹१ फेस व्हॅल्यू असलेल्या २ शेअर्समध्ये विभागला गेला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: colab platforms share price upper circuit 73 days multibagger stock details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.