India China On Rare Earth Magnet: चीननं ४ एप्रिल रोजी मध्यम आणि हेवी रेअर अर्थच्या निर्यातीवर नियंत्रण ठेवण्याची घोषणा केल्यापासून जगभरात त्यांचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. गेल्या काही महिन्यांत चीननं युरोप आणि दक्षिण-पूर्व आशियातील काही देशांना रेअर अर्थ मॅग्नेट्सचा पुरवठा सुरू केला आहे, परंतु भारतीय कंपन्यांना अद्याप निर्यात परवाने जारी केलेले नाहीत. आता बातमी येत आहे की चीन भारताला हेवी रेअर अर्थ मॅग्नेट्स देण्यासाठी काही नवीन अटी ठेवत आहे. चीनचं म्हणणं आहे की भारतीय कंपन्यांनी हे आश्वासन द्यावं की हे मॅग्नेट्स कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला पुन्हा निर्यात केले जाणार नाहीत आणि ते केवळ देशाच्या घरगुती गरजांसाठीच वापरले जातील.
इकॉनॉमिक टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार, भारतीय कंपन्यांनी एंड-यूजर सर्टिफिकेट्स चीनला दिले आहेत. यामध्ये हे आश्वासन देण्यात आले आहे की चीनकडून मिळालेल्या या मॅग्नेट्सचा वापर कोणत्याही मास डिस्ट्रक्शन व्हेइकल्स बनवण्यासाठी केला जाणार नाही. परंतु, आता चीननं नवीन अट लावून पुन्हा पुरवठ्यात अडथळा आणला आहे. चीननं अलीकडेच लाइट रेअर अर्थ मॅग्नेट्सचा पुरवठा पुन्हा सुरू केला आहे, परंतु हेवी रेअर अर्थ मॅग्नेट्सची कमतरता अजूनही कायम आहे.
वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
चीनला नक्की काय हवंय?
ईटीच्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्यानं सांगितलंय की, बीजिंगला वासेनार अरेंजमेंटसारखी निर्यात नियंत्रण हमी हवी आहे. हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे, जो ४२ देशांदरम्यान दुहेरी वापराच्या तंत्रज्ञानाचा जबाबदार वापर सुनिश्चित करतो. भारतानं या करारावर स्वाक्षरी केली आहे, पण चीननं केलेली नाही. एका सूत्राने सांगितले की चीनला हे सुनिश्चित करायचंय आहे की भारताला निर्यात केलेले हेवी रेअर अर्थ मॅग्नेट्स कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेपर्यंत पोहोचू नयेत. मात्र, भारत सरकारनं चीनची ही अट स्वीकारलेली नाही.
एक अन्य सूत्राचं म्हणणं आहे की चीन अमेरिकेसोबत हेवी रेअर अर्थ मॅग्नेट्सबाबत करार करू इच्छितो. अशा परिस्थितीत, अमेरिकेला कोणत्याही मार्गानं करारापूर्वी हे मॅग्नेट्स मिळू नयेत, जेणेकरून ट्रम्पवर दबाव टाकला जाऊ शकेल. म्हणूनच तो भारतावर नवीन अटी लादत आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारतानं सुमारे ८७० टन रेअर अर्थ मॅग्नेट्सची आयात केली, ज्याची किंमत अंदाजे ₹३०६ कोटी होती.
चीनची मक्तेदारी
जगातील हेवी रेअर अर्थ मॅग्नेट्सचा ९०% पुरवठा चीनच्या हातात आहे. म्हणजेच, संपूर्ण जागतिक बाजारपेठेवर त्याची जवळजवळ मक्तेदारी आहे. भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे वाढतं उत्पादन यामुळे याची मागणी झपाट्याने वाढली आहे. विशेषतः कार, थ्री-व्हीलर, ट्रक आणि बसेसच्या मोटर बनवण्यासाठी त्यांचा वापर आवश्यक आहे. रिन्यूएबल एनर्जी प्रोजेक्ट्स मोबाईल फोन, कॉम्प्युटर चिप्स आणि संरक्षण उद्योगात हेवी रेअर अर्थ मॅग्नेट्सचा वापर होतो.