Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > केवळ एक वर्षाचा परतावा पाहून म्युच्युअल फंड निवडताय? राधिका गुप्ता यांनी दिला गुंतवणुकीचा मोलाचा सल्ला

केवळ एक वर्षाचा परतावा पाहून म्युच्युअल फंड निवडताय? राधिका गुप्ता यांनी दिला गुंतवणुकीचा मोलाचा सल्ला

Radhika Gupta Investment Tips: तुम्हीही केवळ गेल्या एक वर्षाचा परतावा पाहून म्युच्युअल फंड निवडता का? जर तुमचे उत्तर 'हो' असेल, तर ही सवय तुमच्या गुंतवणुकीचं नुकसान करू शकतं. पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 15:55 IST2026-02-14T15:53:29+5:302026-02-14T15:55:44+5:30

Radhika Gupta Investment Tips: तुम्हीही केवळ गेल्या एक वर्षाचा परतावा पाहून म्युच्युअल फंड निवडता का? जर तुमचे उत्तर 'हो' असेल, तर ही सवय तुमच्या गुंतवणुकीचं नुकसान करू शकतं. पाहा

Choosing a mutual fund based on just one years returns edelweiss ceo Radhika Gupta gives valuable investment advice | केवळ एक वर्षाचा परतावा पाहून म्युच्युअल फंड निवडताय? राधिका गुप्ता यांनी दिला गुंतवणुकीचा मोलाचा सल्ला

केवळ एक वर्षाचा परतावा पाहून म्युच्युअल फंड निवडताय? राधिका गुप्ता यांनी दिला गुंतवणुकीचा मोलाचा सल्ला

Radhika Gupta Investment Tips: तुम्हीही केवळ गेल्या एक वर्षाचा परतावा पाहून म्युच्युअल फंड निवडता का? जर तुमचे उत्तर 'हो' असेल, तर ही सवय तुमच्या गुंतवणुकीचं नुकसान करू शकतं. एडलवाइस म्युच्युअल फंडच्या सीईओ राधिका गुप्ता यांच्या मते, एका वर्षाच्या चमकदार परताव्याच्या मागे धावणं ही दीर्घकालीन संपत्ती निर्मितीच्या मार्गातील सर्वात मोठी चूक आहे. केवळ एखादा फंड थोड्या काळासाठी परफॉर्मन्स चार्टमध्ये अव्वल ठरला आहे म्हणून त्यात पैसे गुंतवू नका, असा सावधगिरीचा इशारा त्यांनी गुंतवणूकदारांना दिला आहे. योग्य गुंतवणुकीचा आधार हा तात्कालिक परतावा नसून सातत्य आणि दीर्घकालीन कामगिरी असावा, असं त्यांचं ठाम मत आहे.

गुंतवणूकदारांना सावधगिरीचा इशारा

राधिका गुप्ता यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट शेअर केली आहे. एका वर्षाचा ऐतिहासिक परतावा हा चांगल्या गुंतवणुकीचा शत्रू आहे. अनेकदा लोक एका वर्षाच्या कामगिरीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या फंडात गुंतवणूक करतात, ज्यामुळे त्या फंडाची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) झपाट्याने वाढते. मात्र, त्यानंतर कामगिरी खालावू लागते आणि मालमत्तेतही घट होते. ही प्रक्रिया अनेकदा घडताना पाहिली असल्याचे नमूद करत राधिका गुप्ता यांनी गुंतवणूकदारांना सातत्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. गुंतवणुकीचा निर्णय घेताना रोलिंग रिटर्न तपासावं आणि ३ वर्षे, ५ वर्षे तसेच १० वर्षांच्या कालावधीचा विचार करावा, असंही त्यांनी सुचवलंय.

Ola ची डोकेदुखी संपेना! निव्वळ तोटा ₹४८७ कोटींवर, तर महसूलही ५५% नं घसरला; आता शेअर्सवर नजर

बाजार नेहमीच एकसारखा राहत नाही

बाजार हा चक्राकार पद्धतीने चालतो, असं राधिका गुप्ता सांगतात. म्हणजेच तेजीनंतर मंदी येऊ शकते. जेव्हा फंडाचा वेग मंदावतो, तेव्हा त्याची कामगिरीही कमकुवत होऊ लागते. अशा परिस्थितीत, केवळ अलीकडचा परतावा पाहून गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार निराश होतात. ही कथा अनेक बाजार चक्रांमध्ये वारंवार पुनरावृत्ती झाली आहे. विशेषतः जे गुंतवणूकदार फंडाच्या मूलभूत मजबुतीऐवजी केवळ अलीकडच्या परताव्यावर लक्ष केंद्रित करतात, त्यांना याचा मोठा फटका बसतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

केवळ रँकिंगवरून निर्णय घेणे ठरू शकते धोकादायक

राधिका गुप्ता यांच्या मते, एक किंवा दोन वर्षांचे रँकिंग कोणत्याही फंडाची खरी गुणवत्ता दर्शवू शकत नाही. त्यावरून फंडाची गुंतवणूक प्रक्रिया किती शिस्तबद्ध आणि मजबूत आहे हे समजत नाही. केवळ टॉप रँक पाहून गुंतवणूक करणं दीर्घकाळात जोखीम वाढवणारं ठरू शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी फंडाला तीन, पाच किंवा दहा वर्षांच्या दीर्घकालीन 'रोलिंग रिटर्न'च्या आधारे पारखलं पाहिजे. रोलिंग रिटर्नमुळे वेगवेगळ्या काळातील आणि बाजाराच्या विविध स्थितींमधील फंडाच्या कामगिरीचा अंदाज येतो, ज्यामुळे गुंतवणुकीतील स्थिरता अधिक स्पष्ट होते.

अल्पकालीन विचारांपासून दूर राहण्याचे आवाहन

यापूर्वीही राधिका गुप्ता यांनी स्पष्ट केलं होतं की, कोणत्याही फंडाकडे अलीकडच्या कामगिरीवरून पाहू नये. त्यांनी गुंतवणूकदारांना अल्पकालीन विचार सोडण्याचं आवाहन केलं आहे. त्यांच्या मते, कमी कालावधीचा परतावा अनेकदा दिशाभूल करणारा असू शकतो आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी तो नुकसानकारक ठरू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी शाश्वत आणि सातत्यपूर्ण परतावा देणाऱ्या पर्यायांची निवड करणं अधिक हिताचं आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांनी मतं त्यांची मतं वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक कण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकारांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title : केवल एक साल के रिटर्न पर म्यूचुअल फंड न चुनें: राधिका गुप्ता की सलाह

Web Summary : राधिका गुप्ता निवेशकों को केवल एक साल के रिटर्न के आधार पर म्यूचुअल फंड चुनने के खिलाफ सलाह देती हैं। उनका सुझाव है कि अल्पकालिक लाभ के पीछे भागने के बजाय निरंतर, दीर्घकालिक प्रदर्शन पर ध्यान केंद्रित करें। निवेशकों को बेहतर स्थिरता के लिए तीन, पांच या दस वर्षों में रोलिंग रिटर्न पर विचार करना चाहिए।

Web Title : Don't Pick Mutual Funds Based on One-Year Returns: Radhika Gupta's Advice

Web Summary : Radhika Gupta advises investors against choosing mutual funds based solely on one-year returns. She suggests focusing on consistent, long-term performance rather than chasing short-term gains. Investors should consider rolling returns over three, five, or ten years for better stability.