lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > चिप बनविणारे उद्योग नोकऱ्या देणार नाहीत, रघुराम राजन यांनी दिला इशारा

चिप बनविणारे उद्योग नोकऱ्या देणार नाहीत, रघुराम राजन यांनी दिला इशारा

Navi Delhi: सेमी कंडक्टर अर्थात चिप बनवण्याच्या स्पर्धेत भारताने सामील होण्याचे टाळले पाहिजे. चिप बनविण्यापेक्षा देशात मोठ्या प्रकल्पांच्या उभारणीवर तसेच शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर भर दिला पाहिजे, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी रविवारी मांडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 05:55 AM2024-04-01T05:55:59+5:302024-04-01T05:56:15+5:30

Navi Delhi: सेमी कंडक्टर अर्थात चिप बनवण्याच्या स्पर्धेत भारताने सामील होण्याचे टाळले पाहिजे. चिप बनविण्यापेक्षा देशात मोठ्या प्रकल्पांच्या उभारणीवर तसेच शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर भर दिला पाहिजे, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी रविवारी मांडले.

Chip making industries will not provide jobs, warns Raghuram Rajan | चिप बनविणारे उद्योग नोकऱ्या देणार नाहीत, रघुराम राजन यांनी दिला इशारा

चिप बनविणारे उद्योग नोकऱ्या देणार नाहीत, रघुराम राजन यांनी दिला इशारा

नवी दिल्ली  - सेमी कंडक्टर अर्थात चिप बनवण्याच्या स्पर्धेत भारताने सामील होण्याचे टाळले पाहिजे. चिप बनविण्यापेक्षा देशात मोठ्या प्रकल्पांच्या उभारणीवर तसेच शिक्षण व्यवस्था सुधारण्यावर भर दिला पाहिजे, असे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी रविवारी मांडले.

चिप उद्योगासाठी अलिकडेच सरकारने अनेक सवलती जाहीर केल्या. त्यावर राजन म्हणाले की, सरकार शिक्षणावर वर्षभरात खर्च केल्या जाणाऱ्या पैशांपेक्षा अधिक रक्कम चिपसाठीच्या अनुदानावर खर्च करत आहे. यापेक्षा अनेक महत्त्वाची कामे करावयाची आहेत. कॉलेजात सायन्स शिकणाऱ्या मुलांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. चिपच्या उद्योगात जादा कामगारांची गरज भासत नाही. भारताला अधिकाधिक रोजगार देणाऱ्या उद्योगांची सध्या गरज आहे.  

Web Title: Chip making industries will not provide jobs, warns Raghuram Rajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.