Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

चीनच्या या निर्णयामुळे भारतीय ईव्ही आणि कंपोनेंट निर्मात्यांना उत्पादन आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचं उद्योगातील सूत्रांनी सांगितलं. या निर्णयामुळे ऑटोमोबाईल आणि कंपोनेंट उत्पादकांनी सरकारकडे मदत मागितली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 14:10 IST2025-04-25T14:10:00+5:302025-04-25T14:10:53+5:30

चीनच्या या निर्णयामुळे भारतीय ईव्ही आणि कंपोनेंट निर्मात्यांना उत्पादन आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचं उद्योगातील सूत्रांनी सांगितलं. या निर्णयामुळे ऑटोमोबाईल आणि कंपोनेंट उत्पादकांनी सरकारकडे मदत मागितली आहे.

China takes a big step shares of these Indian companies crash tata motors mahindra investors queue to sell | चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

शेअर बाजारातील कामकाजादरम्यान टाटा मोटर्स लिमिटेड आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचे शेअर्स फोकसमध्ये होते. टाटा मोटर्सचा शेअर सुरुवातीच्या व्यवहारात जवळपास २ टक्क्यांनी घसरून ६५५.६० रुपयांवर आला. तर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडचा शेअर १.७५ टक्क्यांनी घसरून २८५०.१५ रुपयांवर आला. शेअर्सच्या या घसरणीमागे चीन सरकारचा निर्णय आहे. वास्तविक, चीननं भारताला होणारा दुर्मिळ अर्थ मॅग्नेटचा थांबवला आहे.

अधिक माहिती काय?

सीएनबीसी-टीव्ही १८ नं दिलेल्या वृत्तानुसार, चीननं भारताला दुर्मिळ अर्थ मॅग्नेटचा पुरवठा थांबवला आहे. चीनच्या या निर्णयामुळे भारतीय ईव्ही आणि कंपोनेंट निर्मात्यांना उत्पादन आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचं उद्योगातील सूत्रांनी सांगितलं. या निर्णयामुळे ऑटोमोबाईल आणि कंपोनेंट उत्पादकांनी सरकारकडे मदत मागितली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीननं ४ एप्रिलपासून भारताला दुर्मिळ अर्थ मॅग्नेटच्या पुरवठ्यावर बंदी घातली आहे आणि आता चीन पुन्हा निर्यात सुरू करण्यासाठी अधिकृत फायनल युजर्स सर्टिफिकेट मागत आहे.

टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती

चीननं काय म्हटलं?

आयातदारांना भारताचं परराष्ट्र मंत्रालय आणि चिनी दूतावास या दोघांची स्वाक्षरी असलेलं फायनल युजर सर्टिफिकेत घ्यावं लागेल. दुर्मिळ अर्थ मॅग्नेटचा वापर शस्त्रं बनवण्यासाठी किंवा कोणत्याही तृतीय पक्षाला देण्यासाठी केला जाणार नाही, याचीही खातरजमा आयातदारांना करावी लागणार आहे. दुर्मिळ अर्थ मॅग्नेट ट्रॅक्शन मोटर्स आणि इलेक्ट्रिक वाहनं आणि ऑटोमोबाईलच्या इतर घटकांचा एक महत्त्वाचा भाग आहेत. तिसऱ्या तिमाही अखेर टाटा मोटर्सच्या ईव्ही नोंदणीत २३ टक्के वाढ झाली होती.

Web Title: China takes a big step shares of these Indian companies crash tata motors mahindra investors queue to sell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.