Lokmat Money > बिझनेस न्यूज > चीन करतोय भारताची तिजोरी खाली; दरवर्षी इतक्या कोट्यवधींचे पाठवतो बिल

चीन करतोय भारताची तिजोरी खाली; दरवर्षी इतक्या कोट्यवधींचे पाठवतो बिल

India Vs China : सोशल मीडियावरुन आपण कितीही चिनी वस्तूंचा बहिष्कार करत असू पण प्रत्यक्षात आकडे पाहिले तर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:39 IST2024-12-17T15:36:21+5:302024-12-17T15:39:31+5:30

India Vs China : सोशल मीडियावरुन आपण कितीही चिनी वस्तूंचा बहिष्कार करत असू पण प्रत्यक्षात आकडे पाहिले तर तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

china is earning billions of rupees every year from india in the form of exports | चीन करतोय भारताची तिजोरी खाली; दरवर्षी इतक्या कोट्यवधींचे पाठवतो बिल

चीन करतोय भारताची तिजोरी खाली; दरवर्षी इतक्या कोट्यवधींचे पाठवतो बिल

India Vs China : आपले शेजारी राष्ट्र चीन कायम भारताला वाकड्या नजरेने पाहतो. चिनी सरकारला धडा शिकवायचा म्हणून केंद्र सरकारने अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. चिनी वस्तूंच्या विरोधात दररोज सोशल मीडियावर निषेध नोंदवला जातो. हे सर्व करुन चीनला आपण वठवणीवर आणू असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मोठ्या गैरसमजात आहात. कारण, तुम्ही खरे आकडे पाहिले तर धक्का बसेल. विशेषत: चीनमधून भारताने आयात केलेल्या वस्तूंचा डेटा पाहून तुमच्या पायाखालची वाळू सरकल्याशिवाय राहणार नाही.

भारतात मोठ्या प्रमाणात चिनी वस्तूंची आयात
आपण सोशल मीडियावर कितीही चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकत असलो तरी चीनशिवाय भारताचं पानही हलणार नाही. ऑटोमोबाईन सेक्टरपासून इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अनेक वस्तूंची आयात चीनमधून होते. २०२३ मध्ये अमेरिका भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. पण, २०२४ मध्ये चीनने हा दर्जा परत मिळवला आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) ने मे २०२४ मध्ये व्यापारासंदर्भात जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये भारत आणि चीनमधील द्विपक्षीय व्यापार सुमारे ११८.४ अब्ज डॉलर्स इतका झाला आहे.

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात (२०२४-२५) एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत अमेरिकेने व्यापाराच्या बाबतीत चीनला थोड्या फरकाने मागे टाकले आहे. या काळात अमेरिका आणि भारत यांच्यात एकूण ५३ अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला, तर भारत आणि चीनमधील व्यापार ५२.४३ अब्ज डॉलर्सचा होता.

चीनने भारताकडून किती पैसे कमवले?
चालू आर्थिक वर्षात (२०२४-२५) एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत चीनने भारताला ४६.६ अब्ज डॉलर्स किमतीचा माल पाठवला आहे. तर, भारताने चीनला ५.७ अब्ज डॉलर्सचा माल निर्यात केला, जो आयातीच्या केवळ ८ टक्के आहे. त्याच वेळी, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२३-२४ मध्ये चीनमधून भारताची आयात १०१ अब्ज डॉलर होती.

गेल्या ५ वर्षांची आकडेवारी
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, जर आपण २०१९ बद्दल बोललो तर भारत आणि चीनमध्ये सुमारे ८२ अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला होता. यामध्ये ६५ अब्ज डॉलर्सची आयात आणि १६ अब्ज डॉलर्सची निर्यात झाली. २०२० बद्दल बोलायचे तर, या वर्षी दोन्ही देशांमध्ये सुमारे ८६.५ अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला. यामध्ये आयात ६५ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त तर निर्यात २१ अब्ज डॉलर्सची होती.

2021 बद्दल बोलायचे तर, या वर्षी भारत आणि चीनमध्ये ११५ अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला. या काळात २१ अब्ज डॉलरची निर्यात झाली. पण निर्यात ९४.५ अब्ज डॉलरवर पोहोचली. २०२२ मध्ये हा आकडा ११३ अब्ज डॉलर गेला. यावर्षी निर्यातीत २८ टक्क्यांची मोठी घसरण दिसून आली. याउलट आयात ९८.५ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. २०२३ बद्दल बोलायचे तर, या वर्षी दोन्ही देशांमध्ये ११८ अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला. यामध्ये आयात १०१ अब्ज डॉलर्स आणि निर्यात फक्त १६.६ अब्ज डॉलर्सची होती.

Web Title: china is earning billions of rupees every year from india in the form of exports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.