Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी

गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी

Home Loan Rate : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ३० लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जांवर ७.२५% ते ८.७०% दरम्यान व्याजदर देते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 15:22 IST2025-12-25T14:50:04+5:302025-12-25T15:22:14+5:30

Home Loan Rate : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ३० लाख रुपयांपर्यंतच्या गृहकर्जांवर ७.२५% ते ८.७०% दरम्यान व्याजदर देते.

Cheapest Home Loan Rates 2026 Compare SBI, Union Bank, and LIC Housing Finance Rates | गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी

गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी

Home Loan Rate : हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी कर्जाचा व्याजदर हा सर्वात महत्त्वाचा विषय असतो. गृहकर्ज हे साधारणपणे १५ ते २० वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीसाठी घेतले जाते, त्यामुळे व्याजात झालेला थोडासा बदलही तुमच्या खिशावर मोठा परिणाम करू शकतो. त्यातच एका वर्षात आरबीआयने रेपो दरात १२५ बेसिस पॉईंटची कपात केली आहे. परिणामी व्याजदर कमी झाला आहे. सध्या सरकारी बँकांमध्ये स्वस्त होम लोन देण्यासाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे.

सर्वात स्वस्त होम लोन देणाऱ्या टॉप बँका
ताज्या आकडेवारीनुसार आणि उपलब्ध माहितीनुसार, सध्या बाजारातील काही प्रमुख बँकांचे सुरुवातीचे व्याजदर

  1. सेंट्रल बँक ऑफ इंडिया : ७.१०%
  2. इंडियन ओव्हरसीज बँक : ७.१०%
  3. बँक ऑफ इंडिया : ७.१०%
  4. बँक ऑफ महाराष्ट्र : ७.१०%
  5. युनियन बँक ऑफ इंडिया : ७.१५%
  6. एलआयसी हाऊसिंग फायनान्स : ७.१५%
  7. स्टेट बँक ऑफ इंडिया : ७.२५%
  8. कॅनरा बँक : ७.२५%

प्रमुख बँकांचे सविस्तर दर
१. युनियन बँक ऑफ इंडिया

ही बँक सध्या ३० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर ७.१५% पासून सुरुवात होणारा व्याजदर ऑफर करत आहे. हाच दर ७५ लाखांवरील कर्जासाठीही लागू होऊ शकतो, मात्र ग्राहकाच्या प्रोफाइलनुसार तो ९.५०% पर्यंत जाऊ शकतो.

२. स्टेट बँक ऑफ इंडिया
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयमध्ये ३० लाखांपर्यंतच्या होम लोनसाठी ७.२५% ते ८.७०% दरम्यान व्याजदर आकारला जातो. मोठ्या कर्जासाठीही हीच श्रेणी लागू आहे.

३. बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदामध्ये ३० लाखांपर्यंतच्या कर्जावर ७.४५% ते ९.२५% व्याजदर आहे. ७५ लाखांवरील कर्जासाठी हा दर ९.५०% पर्यंत जातो. सुरुवातीच्या दराच्या बाबतीत ही बँक एसबीआय आणि युनियन बँकेपेक्षा थोडी महाग ठरते.

४. एलआयसी हाऊसिंग फायनान्स
बँकांव्यतिरिक्त एलआयसी हाऊसिंग फायनान्स देखील आकर्षक दर देत आहे. येथे ३० लाखांपर्यंतच्या आणि त्यावरील कर्जासाठी ७.१५% असा सुरुवातीचा वार्षिक व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.

गृहकर्ज घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • केवळ कमी व्याजदर पाहून गृहकर्ज निवडणे चुकीचे ठरू शकते. खालील बाबींचा विचार नक्की करा
  • सिबिल स्कोअर : तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल (७५०+) तरच तुम्हाला बँक सर्वात कमी (किमान) व्याजदर देते. स्कोअर कमी असल्यास व्याजदर वाढू शकतो.
  • इतर शुल्क : व्याजदरासोबतच प्रोसेसिंग फी आणि प्री-पेमेंट चार्जेस तपासा.

वाचा - एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी

  • प्रोफाइल तपासणी : बँक कर्ज देण्यापूर्वी तुमची उत्पन्न क्षमता, वय आणि नोकरीचे स्वरूप या सर्व गोष्टींची पडताळणी करते.

 

Web Title : होम लोन: जानिए टॉप बैंकों की सबसे सस्ती ब्याज दरें

Web Summary : घर खरीदने का सपना? सेंट्रल बैंक ऑफ इंडिया (7.10%) और एसबीआई (7.25%) जैसे टॉप बैंकों की ब्याज दरों की तुलना करें। निर्णय लेने से पहले सिबिल स्कोर और प्रोसेसिंग फीस पर विचार करें।

Web Title : Home Loan: Find the Cheapest Interest Rates from Top Banks

Web Summary : Dreaming of owning a home? Compare interest rates from top banks like Central Bank of India (7.10%) and SBI (7.25%). Consider CIBIL score and processing fees before deciding.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.