Lokmat Money > बिझनेस न्यूज > चहा विकणारी कंपनी आणणार IPO, महाकुंभदरम्यान एका दिवसात विकलेला १ लाख कप चहा

चहा विकणारी कंपनी आणणार IPO, महाकुंभदरम्यान एका दिवसात विकलेला १ लाख कप चहा

Tea Point IPO: जर तुम्ही शेअर मार्केट किंवा आयपीओमधून पैसे कमवत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची ठरू शकते. पाहा कोणती आहे ही कंपनी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 13:54 IST2025-02-27T13:53:36+5:302025-02-27T13:54:24+5:30

Tea Point IPO: जर तुम्ही शेअर मार्केट किंवा आयपीओमधून पैसे कमवत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची ठरू शकते. पाहा कोणती आहे ही कंपनी?

chaipoint tea giant to enter on stock market soon planning to launch ipo know details Prayagraj Maha Kumbh sell tea | चहा विकणारी कंपनी आणणार IPO, महाकुंभदरम्यान एका दिवसात विकलेला १ लाख कप चहा

चहा विकणारी कंपनी आणणार IPO, महाकुंभदरम्यान एका दिवसात विकलेला १ लाख कप चहा

Tea Point IPO: जर तुम्ही शेअर मार्केट किंवा आयपीओमधून पैसे कमवत असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची ठरू शकते. भारतातील आघाडीची चहा विक्री करणारी कंपनी चाय पॉईंट लवकरच आपला आयपीओ शेअर बाजारात आणू शकते. कंपनीच्या सहसंस्थापकांनी दिलेल्या माहितीनुसार, चाय पॉईंट २०२६ च्या मध्यापर्यंत शेअर बाजारात लिस्ट होण्याची योजना आखत आहे.

एकाच दिवसात १ लाख कप चहा विकला

प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यादरम्यान चाय पॉईंटनं नुकतीच लोकप्रियता मिळवली आणि अनेक मुख्य दिवशी त्याच्या दुकानातून दिवसाला एक लाख कप चहाची विक्री झाली. खन्ना यांना २००९ मध्ये मुंबईतील एका कॅफेमध्ये आपला विद्यार्थी अमुलिक सिंग बिजरालसोबत गरमागरम चहाची आनंद घेताना याची कल्पना सुचली होती.

कशी आली आयडिया?

खन्ना हे हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. "रस्त्याच्या कडेला एक लहान मुलगा ग्राहकांना प्लॅस्टिकच्या कपमध्ये चहा विकत होता. अशी मुलं लाखो लोकांना अत्यंत वाईट प्लॅस्टिकच्या कपमध्ये चहा देतात आणि स्वच्छताही फारशी चांगली नसते. तेव्हाच विचार आला की आपण अस्सल, चवदार आणि उच्च प्रतीचा चहा लोकांना परवडणाऱ्या दरात स्वच्छ पद्धतीनं का उपलब्ध करून देऊ शकत नाही आणि त्याचवेळी त्या मुलांनाही रोजगार का देऊ शकत नाही," असं ते म्हणाले.

पहिलं स्टोअर कुठे?

२०१० मध्ये बंगळुरूमधील कोरमंगला मध्ये चाय पॉईंटचं पहिलं आऊटलेट सुरू करण्यात आल्याचं खन्ना म्हणाले. आज ही कंपनी ९ लाख कपांपेक्षा अधिक चहाची विक्री करते. सोबतच सँडविच, पकोडे आणि अन्य खाद्यपदार्थांची विक्रीही केली जाते. आज आपली १७० पेक्षा अधिक स्टोअर्स आहेत आणि दोन वर्षात ३०० आणखी स्टोअर्स उघडण्याची योजना असल्याचंही त्यांनी सांगितलं.

१४०० कर्मचारी

"सध्या आमच्याकडे जवळपास १४०० कर्मचारी आहेत. प्रत्येक स्टोअर सुरू करताना सहा अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. अशातच स्टोअर्स वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या संख्येत ९५ टक्क्यांची वाढ होईल. महाकुंभादरम्यान प्रयागराजमध्ये उघडलेल्या दुकानांमध्ये दररोज ९ लाख कप चहांची विक्री होती. प्रत्येक दिवसाला किमान १ लाख कप चहाची विक्री झाली. ही संख्या आता कमी होत आहे," असंही खन्ना म्हणाले. 

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: chaipoint tea giant to enter on stock market soon planning to launch ipo know details Prayagraj Maha Kumbh sell tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.