lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुड न्यूज! सरकारने २३.५९ कोटी नोकरदारांच्या खात्यात पाठवले पैसे; तुमचा बॅलेन्स चेक करा

गुड न्यूज! सरकारने २३.५९ कोटी नोकरदारांच्या खात्यात पाठवले पैसे; तुमचा बॅलेन्स चेक करा

सर्वप्रथम तुम्हाला https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ येथे क्लिक करुन खाते तयार करावे लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 01:37 PM2021-12-21T13:37:59+5:302021-12-21T13:39:02+5:30

सर्वप्रथम तुम्हाला https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ येथे क्लिक करुन खाते तयार करावे लागेल.

Central government sent money to the accounts of 23.59 crore employees PF Account | गुड न्यूज! सरकारने २३.५९ कोटी नोकरदारांच्या खात्यात पाठवले पैसे; तुमचा बॅलेन्स चेक करा

गुड न्यूज! सरकारने २३.५९ कोटी नोकरदारांच्या खात्यात पाठवले पैसे; तुमचा बॅलेन्स चेक करा

नवी दिल्ली – देशातील २३.५९ कोटी नोकरदार वर्गासाठी आनंदाची बातमी आहे. EPFO ने व्याजाच्या हप्त्याशी संबंधित पैसे वापरकर्त्यांच्या खात्यात हस्तांतरित केले आहेत. EPFO ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात ८.५० टक्के दराने २३.५९ कोटी लोकांच्या खात्यांमध्ये PF व्याजाचे पैसे जारी करण्यात आले आहेत.

जर तुमचा EPF देखील कापला गेला असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यात जमा झालेल्या पैशांची माहिती काही सेकंदात मिळू शकते. यासाठी तुम्हाला ईपीएफओच्या वेबसाइटवर जाण्याचीही गरज भासणार नाही. तुमच्याकडे फक्त तुमचा UAN असणे आवश्यक आहे आणि तुमचा मोबाईल नंबर EPF खात्याशी जोडलेला असावा. फक्त एसएमएस किंवा कॉल करा आणि तुमच्या EPF खात्याचा तपशील तुमच्या फोनवर मेसेजमध्ये येईल.

फक्त एक कॉल करा आणि तुमच्या EPF खात्यातील शिल्लक तपासा

फ्री कॉलच्या या युगात, मिस्ड कॉल तुमच्या EPF खात्याची संपूर्ण माहिती घेऊ शकता. तुमचा मोबाईल नंबर UAN शी लिंक असेल तर 011-22901406 वर मिस्ड कॉल द्या. थोड्याच वेळात तुमच्या EPF खात्याची संपूर्ण माहिती तुमच्या मेसेजमध्ये येईल.

SMS द्वारे तुमची ईपीएफ शिल्लक तपासा

सर्वप्रथम तुम्हाला https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ येथे क्लिक करुन खाते तयार करावे लागेल. जिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे. जर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आधीच रजिस्टर केला असेल तर तुम्हाला थेट मोबाईलवरून मेसेज पाठवावा लागेल. एवढंच लक्षात ठेवा की तुम्ही ईपीएफओमध्ये कोणताही मोबाइल नंबर नोंदवला असेल, त्याच नंबरवरून एसएमएस करा.

हा संदेश टाइप करून एसएमएस पाठवा

मोबाईलवरून SMS करण्यासाठी मेसेजमध्ये जा आणि EPFOHO UAN ENG टाइप करा. यानंतर तुम्ही 7738299899 वर पाठवा. काही वेळाने, तुमच्या EPFशी संबंधित सर्व माहिती एसएमएसद्वारे तुमच्या मोबाईलवर येईल.

प्राप्त झालेल्या संदेशाची भाषा बदलू शकता

तुम्हाला इतर कोणत्याही भाषेत एसएमएस प्राप्त करायचा असेल, तर त्यासाठी भाषा बदलण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. जिथे तुम्ही मेसेजच्या शेवटच्या भागात ENG टाईप केले असेल तिथे दुसऱ्या भाषेतील तीन अक्षरे लिहा. उदाहरणार्थ, English-  ENG Telugu- TEL Punjabi- PUN Gujarati- GUJ Marathi- MAR Malayalam- MAL Tamil- TAM Kannada- KAN Bengali- BEN

उमंग अॅपद्वारे माहिती मिळवा

जर तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर तुम्ही जेव्हा हवे तेव्हा अॅपद्वारे तुमची ईपीएफ शिल्लक तपासू शकता. यासाठी UMANG AF ओपन करा आणि EPFO ​​वर क्लिक करा. यामध्ये Employee Centric Services वर क्लिक करा आणि त्यानंतर View Passbook वर क्लिक करा आणि UAN आणि पासवर्ड टाका. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP येईल. ते प्रविष्ट केल्यानंतर, आपण EPF शिल्लक पाहू शकता.

Web Title: Central government sent money to the accounts of 23.59 crore employees PF Account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.