GST Rate Cut on Cement : जीएसटीचे नवीन दर लागू झाल्याने फक्त किराणा सामानच नाही तर बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तूही स्वस्त झाल्या आहेत. नवीन घर बांधायचं म्हटलं की मोठा खर्च हा सिमेंट खरेदीसाठी लागतो. पण, आता जीएसटी सुधारणा झाल्याने सिमेंटची गोणीवर मोठी बचत होणार आहे. सिमेंटवरील वस्तू आणि सेवा कर २८ टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. पण, कंपन्यांनी चलाखी केली तर याचा फायदा ग्राहकांना मिळणार नाही.
हा बदल २२ सप्टेंबर २०२५ पासून लागू झाला आहे. या निर्णयामुळे सिमेंटच्या किमतीत जवळपास १० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता असून, बांधकाम खर्चात मोठी बचत होणार आहे.
घर बांधणाऱ्यांना थेट हजारो रुपयांची बचत
सिमेंटवरील टॅक्स कमी झाल्याचा सर्वात मोठा आणि थेट फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे.
किंमत कपात: तज्ञांच्या मते, आता सिमेंटच्या एका गोणीमागे ₹४० ते ₹५० पर्यंतची कपात अपेक्षित आहे.
जिथे अल्ट्राटेक, एसीसी, अंबुजा यांसारख्या कंपन्यांच्या सिमेंटची गोणी सध्या ४२५ रुपयांपर्यंत मिळत होती, तिथे आता ती ३७५ ते ३८५ रुपयांपर्यंत खाली येऊ शकते.
जर एखादी व्यक्ती २०० ते ३०० सिमेंटच्या गोण्या खरेदी करत असेल, तर त्याला थेट हजारो रुपयांची बचत होणार आहे.
मोठे प्रकल्प आणि प्रादेशिक फायदे
ही जीएसटी कपात केवळ घर बांधणाऱ्यांसाठीच नाही, तर मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठीही फायदेशीर आहे.
- प्रकल्प खर्च कमी: रस्ते, पूल, सरकारी इमारती आणि मोठे औद्योगिक प्रकल्प यांसारख्या मोठ्या बांधकामांमध्ये सिमेंटचा सर्वाधिक वापर होतो. टॅक्स कमी झाल्याने या प्रकल्पांची एकूण किंमत लक्षणीयरीत्या घटेल.
- रोजगार निर्मिती: बांधकाम खर्च कमी झाल्यामुळे प्रकल्पांची गती वाढेल, परिणामी, मजूर आणि इतर कामगारांची मागणी वाढून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.
- हिमाचल प्रदेशातून सिमेंटचा पुरवठा होणाऱ्या पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरसारख्या राज्यांतील ग्राहकांनाही याचा मोठा लाभ मिळणार आहे.
वाचा - पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
कंपन्यांनी जबाबदारी घेणे महत्त्वाचे
- सरकारने जीएसटी कपात करून आपला दिलासा दिला आहे, पण हा फायदा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याची खरी जबाबदारी सिमेंट कंपन्यांची आहे.
- स्थिरता आवश्यक: गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक मोठ्या सिमेंट कंपन्यांनी प्रति गोणी ५ ते १० रुपयांपर्यंत दरवाढ केली होती. जर टॅक्स कपातीनंतरही कंपन्यांनी वारंवार सिमेंटच्या मूलभूत दरात वाढ करणे सुरू ठेवले, तर या जीएसटी कपातीचा फायदा सर्वसामान्यांना मिळणार नाही.
- तज्ञांनी कंपन्यांना आवाहन केले आहे की त्यांनी बेस किंमत स्थिर ठेवून या सरकारी निर्णयाचा संपूर्ण लाभ ग्राहकांना द्यावा.