Car Loan Calculator: जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी कर्ज घेणार असाल, तर केवळ डीलरशिपच्या ऑफरवर अवलंबून राहू नका. बँक, लोन एग्रीगेटर वेबसाइट्स आणि ऑनलाइन पोर्टल्सवर दरांची तुलना करून तुम्ही उत्तम डील मिळवू शकता. चला जाणून घेऊया की ५ वर्षांसाठी १० लाख रुपयांचं सर्वात स्वस्त कर्ज कोणती बँक देत आहे आणि तुम्हाला त्याचा ईएमआय (EMI) किती लागेल.
बँकबाजारच्या ताज्या आकडेवारीनुसार, १० लाख रुपयांच्या नवीन कार कर्जावर (५ वर्षांची मुदत) सार्वजनिक (सरकारी) आणि खासगी बँकांमध्ये व्याजाचे दर ७.८५% ते ९.९९% पर्यंत आहेत. परंतु, वास्तविक व्याजदर ग्राहकाची क्रेडिट प्रोफाइल, उत्पन्न आणि कर्ज परतफेडीचा इतिहास यावर अवलंबून असतो.
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
सरकारी बँकांचे व्याजदर आणि EMI
पंजाब नॅशनल बँक (PNB) -- -७.८५% --२०,२०५ रुपये
युनियन बँक ऑफ इंडिया -- ७.९०% -- २०,२२९ रुपये
बँक ऑफ बडोदा -- ८.१५% -- २०,३४८ रुपये
कॅनरा बँक -- ८.२०% -- २०,३७२ रुपये
खासगी बँकांचे व्याजदर आणि EMI
आयडीबीआय बँक (IDBI Bank) -- ७.९५% -- २०,२५२ रुपये
आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) -- ८.५% -- २०,५१७ रुपये
ॲक्सिस बँक (Axis Bank) -- ८.८% -- २०,६६१ रुपये
एचडीएफसी बँक (HDFC Bank) -- ९.४०% -- २०,९५३ रुपये
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank) -- ९.९९% -- २१,२४२ रुपये
पंजाब नॅशनल बँक आहे सर्वात स्वस्त पर्याय
जर तुम्हाला कमी ईएमआयवर कार कर्ज घ्यायचे असेल, तर पंजाब नॅशनल बँक (PNB) सारख्या सरकारी बँका तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. त्यांच्या तुलनेत खासगी बँकांमध्ये व्याजदर थोडे अधिक असतात. पंजाब नॅशनल बँक सर्वात स्वस्त पर्याय आहे, जिथे नवीन कार कर्जाचा व्याजदर ७.८५% पासून सुरू होतो. ५ वर्षांच्या १० लाख रुपयांच्या कार कर्जाचा ईएमआय २०,२०५ रुपये इतका होतो.
या गोष्टी लक्षात ठेवा
- क्रेडिट स्कोर चांगला असल्यास व्याजदर कमी मिळू शकतो.
- कार डीलरच्या फायनान्स स्कीमऐवजी वेगवेगळ्या बँकांची तुलना करणं चांगलं राहील.
- ईएमआय ठरवण्यापूर्वी आपलं मंथली बजेट आणि निश्चित खर्च विचारात घ्या.
- नवीन कारसाठी कर्ज घेण्यापूर्वी फक्त एका बँकेवर अवलंबून राहू नका. व्याजदरांमध्ये जवळपास २ टक्क्यांपर्यंत फरक आहे, ज्यामुळे तुमच्या ईएमआयमध्ये वर्षांपर्यंत फरक पडू शकतो.
(टीप: यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. बँकांचे व्याजदर हे अनेक बाबींवर अवलंबून असतात. कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी संबंधित बँका किंवा तज्ज्ञांशी संपर्क साधणं आवश्यक आहे.)
