Lokmat Money > बिझनेस न्यूज > दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

टेक जायंट Apple नं अखेर आयफोन १७ सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये आयफोन १७, आयफोन १७ एअर, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्सचा समावेश आहे. परंतु त्यांच्या किंमतीनं सामान्य ग्राहकांना आश्चर्यचकित केलंय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 11:23 IST2025-09-11T11:22:46+5:302025-09-11T11:23:51+5:30

टेक जायंट Apple नं अखेर आयफोन १७ सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये आयफोन १७, आयफोन १७ एअर, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्सचा समावेश आहे. परंतु त्यांच्या किंमतीनं सामान्य ग्राहकांना आश्चर्यचकित केलंय.

car can be bought for the price of two iPhones 17 what can a common person buy for this much money | दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

टेक जायंट Apple नं अखेर आयफोन १७ सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये आयफोन १७, आयफोन १७ एअर, आयफोन १७ प्रो आणि आयफोन १७ प्रो मॅक्सचा समावेश आहे. परंतु त्यांच्या किंमतीनं सामान्य ग्राहकांना आश्चर्यचकित केलंय. सर्वात प्रीमियम मॉडेलची सुरुवातीची किंमत २ लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. अशा परिस्थितीत, मोठा प्रश्न असा आहे की दोन आयफोन १७ खरेदी करण्याऐवजी सामान्य माणूस कोणत्या आवश्यक गोष्टी आरामात खरेदी करू शकतो.

जर तुम्ही दोन आयफोन १७ (सुमारे ४ लाख) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याच पैशानं तुम्ही अनेक मोठी स्वप्नं पूर्ण करू शकता. उदाहरणार्थ- ४ लाख रुपयांमध्ये मारुती सुझुकी अल्टो के १० किंवा रेनो क्विड सारखी कार तुम्हाला खरेदी करता येईल. इतकंच काय तर सध्याच्या दरानुसार ३०-४० ग्रॅम सोनंही तुम्ही खरेदी करू शकता.

सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स

शैक्षणिक खर्च : एक चांगल्या खासगी महाविद्यालयात २ वर्षांची फी किंवा परदेशात शॉर्ट टर्म कोर्स तुम्ही पूर्ण करू शकता.

होम फर्निचर : पूर्णपणे नवीन एलईडी टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि एसीचा कॉम्बो पॅक खरेदी करून घर अपग्रेड केलं जाऊ शकतं.

ट्रॅव्हल : १०-१२ दिवसांची युरोप किंवा अमेरिकेचा प्रवास ४ लाखांमध्ये आरामात होऊ शकतो.

हे तुमच्या प्राधान्यक्रमावर अवलंबून आहे ज्यात तुम्ही हे बजेट कसं वापरायचं हे ठरवू शकता. मग तुम्ही दोन iPhone 17 Pro Max निवडाल की वर दिलेल्या पर्यायांपैकी काही एक.

किती आहे किंमत?

iPhone 17 Pro Max च्या 256GB ची किंमत १,४९,९०० रुपये

iPhone 17 Pro Max च्या 512GB ची किंमत १,६९,९०० रुपये

iPhone 17 Pro Max च्या 1TB ची किंमत १,८९,९०० रुपये

iPhone 17 Pro Max च्या 2TB ची किंमत २,२९,९०० रुपये

Web Title: car can be bought for the price of two iPhones 17 what can a common person buy for this much money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.