Lokmat Money > बिझनेस न्यूज > ७० किंवा ९० नाही तर आठवड्यात इतके तास..; कामांच्या तासावरुन आणखी एका CEO चे वक्तव्य चर्चेत!

७० किंवा ९० नाही तर आठवड्यात इतके तास..; कामांच्या तासावरुन आणखी एका CEO चे वक्तव्य चर्चेत!

Work Hours In Week: कॅपजेमिनी इंडियाचे सीईओ अश्विन यार्दी यांनी आठवड्यात किती तास काम करावे? यावर आपलं मत मांडलं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 15:17 IST2025-02-26T15:17:06+5:302025-02-26T15:17:43+5:30

Work Hours In Week: कॅपजेमिनी इंडियाचे सीईओ अश्विन यार्दी यांनी आठवड्यात किती तास काम करावे? यावर आपलं मत मांडलं.

capgemini india ceo ashwin yardi advocates 47 5 working hours in a week | ७० किंवा ९० नाही तर आठवड्यात इतके तास..; कामांच्या तासावरुन आणखी एका CEO चे वक्तव्य चर्चेत!

७० किंवा ९० नाही तर आठवड्यात इतके तास..; कामांच्या तासावरुन आणखी एका CEO चे वक्तव्य चर्चेत!

Work Hours In Week: अलीकडच्या काळात कामांचे तास किती असावेत? यावरुन देशात वादविवाद सुरू आहे. इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या एका वक्तव्याने याची सुरुवात झाली. मूर्ती यांनी आठवड्यातून ७० तास काम करण्याचा सल्ला तरुणांना दिला होता. त्यांच्यानंतर अभियांत्रिकी क्षेत्रातील दिग्गज कंपनी L&T चे अध्यक्ष एसएन सुब्रमण्यन यांनी या वादात उडी घेतली. "घरी बोयकोचं तोंड किती वेळ पाहणार?" असं वादग्रस्त वक्तव्य करुन आठवड्यातून ९० तास काम करण्याचा सल्ला दिला. यासाठी त्यांना खूप ट्रोल करण्यात आले. अशात आता कामाच्या तासांबाबत आणखी एका सीईओंचे विधान चर्चेत आलं आहे. आयटी सेवा कंपनी कॅपजेमिनी इंडियाचे सीईओ अश्विन यार्दी यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली आहे.

आठवड्यात किती तास काम करणे योग्य?
नॅसकॉम टेक्नॉलॉजी आणि लीडरशिप फोरममध्ये सीईओ अश्विन यार्दी उपस्थित होते. त्यादरम्यान एका कर्मचाऱ्याने त्यांना दर आठवड्याला किती तास काम करावे? असा प्रश्न विचारला. त्यावेळी ते म्हणाले, ४७ तास २० मिनिटे. आमच्याकडे ९ तासांची शिफ्ट असून आठवड्यात फक्त ५ दिवस काम असते. त्यांनी उत्तर दिले की, मी गेल्या 4 वर्षांपासून आठवड्याच्या शेवटी कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा ईमेल पाठवू नये या तत्त्वावर काम करत आहे.

वर्क लाईफ बॅलन्सचे समर्थन
आठवड्यात कामाचे तास ४७.५ असायला हवेत, यावर जोर देताना अश्विन यार्दी म्हणाले, कर्मचाऱ्यांच्या सुट्टीच्या वेळेचा आपण आदर करायला हवा. अनेकदा गरज असताना कर्मचारी स्वतःहून वीकेंडला काम करतात. मात्र, अशा कामांसाठी कर्मचाऱ्यांवर ओझे वाढविण्यात काही अर्थ नाही.

वर्क लाइफ बॅलन्स काम महत्त्वाचे आहे?
वर्क लाइफ बॅलन्स हे निरोगी कामाच्या वातावरणासाठी महत्त्वाचे आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहते. जर कामगार समाधानी आणि आनंदी असेल तर त्याची उत्पादकता वाढते. वास्तवात, गेल्या काही वर्षात खासगी क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये कामाचा ताण सातत्याने वाढत आहे. यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार कर्मचाऱ्यांना उद्भवत आहेत.

Web Title: capgemini india ceo ashwin yardi advocates 47 5 working hours in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.