Lokmat Money > बिझनेस न्यूज > अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज

अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज

Elon Musk Starlink: इलॉन मस्क यांची कंपनी स्टारलिंक लवकरच भारतात आपली सेवा सुरू करणार आहे. स्टारलिंकला भारत सरकारकडून परवाना मिळालाय.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 11:11 IST2025-06-12T11:10:16+5:302025-06-12T11:11:51+5:30

Elon Musk Starlink: इलॉन मस्क यांची कंपनी स्टारलिंक लवकरच भारतात आपली सेवा सुरू करणार आहे. स्टारलिंकला भारत सरकारकडून परवाना मिळालाय.

can elon musk compete with mukesh ambani jio price of starlink s internet will be the only predictor | अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज

अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज

Elon Musk Starlink: इलॉन मस्क यांची कंपनी स्टारलिंक लवकरच भारतात आपली सेवा सुरू करणार आहे. स्टारलिंकला भारत सरकारकडून परवाना मिळालाय. येत्या दोन महिन्यांत कंपनी भारतात काम सुरू करणारे. स्टारलिंक भारतातील दुर्गम भागात इंटरनेट पोहोचवणार आहे. कंपनी ग्राहकांना एक महिन्यासाठी फ्री ट्रायलही देणारे. ज्या भागात अद्याप इंटरनेट नाही अशा भागात कनेक्टिव्हिटी सुधारण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे. मात्र, मुकेश अंबानी यांची जिओ ज्या किमतीत भारतात इंटरनेट सेवा देत आहे, त्या तुलनेत मस्क यांची सेवा अत्यंत महाग दिसत आहे. डिव्हाइस कॉस्ट आणि दोघांच्या मंथली सब्सक्रिप्शन प्लॅनमध्येही फरक आहे.

सॅटेलाइट इंटरनेट सेवेसाठी दूरसंचार विभागाकडून परवाना मिळवणारी स्टारलिंक ही तिसरी कंपनी आहे. यापूर्वी युटेलसॅटच्या वनवेब आणि रिलायन्स जिओलाही भारतात सेवा देण्यास मान्यता मिळाली आहे. मस्क यांची कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक खास ऑफर घेऊन येत आहे. कंपनी प्रत्येक डिव्हाइसच्या खरेदीवर एक महिन्यासाठी फ्री ट्रायल देणारे. यामुळे ग्राहकांना सेवा विकत घेण्यापूर्वी त्याची पडताळणी करता येईल. ग्राहकांना ही सेवा आवडली तर ते मंथली प्लॅन घेऊ शकतात.

३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स

किती आहे किंमत?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्टारलिंकनं भारतात त्यांच्या प्लॅनची ​​किंमत देखील निश्चित केली आहे. या सॅटेलाइट डिश डिव्हाइसची किंमत सुमारे ३३,००० रुपये असेल. ग्राहकांना दरमहा अमर्यादित डेटासाठी ३,००० रुपये द्यावे लागतील. स्टारलिंकचा मुख्य उद्देश भारतातील दुर्गम भागात ज्या ठिकाणी ब्रॉडबँड सेवा पोहोचलेली नाही त्या ठिकाणी इंटरनेट आणणं हा आहे. स्टारलिंकचे उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत फिरतात. ज्या भागात अद्याप इंटरनेट नाही अशा भागातही हे उपग्रह हाय स्पीड इंटरनेट देऊ शकतात.

स्टारलिंकची किंमत शेजारच्या देशांइतकीच आहे. बांगलादेश आणि भूतानमध्येही स्टारलिंक डिव्हाइसची किंमत ३३,००० रुपये आहे. मस्क यांची कंपनी सध्या १०० हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. फायनान्शिअल एक्सप्रेसच्या मते, बहुतेक ठिकाणी घरांसाठी दोन प्रकारच्या योजना आहेत: रेजिडेन्शिअल लाईट आणि रेजिडेन्शिअल. रेजिडेन्शिअल लाईट कमी इंटरनेट वापरणाऱ्यांसाठी आहे. तर रेजिडेन्शिअल म्हणजे इंटरनेटचा भरपूर वापर करणाऱ्यांसाठी आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला स्टारलिंकने मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ आणि सुनील मित्तल यांची भारती एअरटेल यांच्याशी करार केला होता. या भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या आहेत.

मस्क यांची सेवा महागडी

स्टारलिंकचं ३३,००० रुपयांचं डिव्हाइस आणि ३,००० रुपयांचे मासिक सब्सक्रिप्शन यामुळे ते जिओच्या सध्याच्या इंटरनेट सेवेपेक्षा खूप महाग आहे. भारतातील सध्याचे ब्रॉडबँड आणि ५ जी नेटवर्क खूप व्यापक आणि परवडणारं आहे. मुकेश अंबानी यांचे जिओ फायबर-टू-द-होम (एफटीटीएच) तंत्रज्ञान ऑप्टिकल फायबर केबल टाकून घरोघरी इंटरनेट पोहोचवते. हे सर्वात स्थिर आणि हाय-स्पीड इंटरनेट प्रदान करते. जिओफायबरचे प्लान ३९९ रुपयांपासून १,४९९ रुपयांपर्यंत सुरू होतात, जे स्टारलिंकपेक्षा खूप स्वस्त आहेत. बऱ्याचदा इन्स्टॉलेशन चार्ज सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून आकारला जातो किंवा प्लॅनसोबत बंडल केला जातो. ही स्टारलिंकच्या ३३,००० रुपयांच्या डिव्हाइस किंमतीपेक्षा खूपच कमी आहे.

Web Title: can elon musk compete with mukesh ambani jio price of starlink s internet will be the only predictor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.