Lokmat Money > बिझनेस न्यूज > बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स

बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स

Buying a Home : जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर घर खरेदी केल्यास तुमची लाखो रुपयांची बचत हमखास होईल. कशी ते वाचा.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 11:49 IST2025-07-23T11:43:29+5:302025-07-23T11:49:03+5:30

Buying a Home : जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर घर खरेदी केल्यास तुमची लाखो रुपयांची बचत हमखास होईल. कशी ते वाचा.

Buying a Home in India in Wife's Name Tax Benefits, Lower Interest Rates & More | बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स

बायकोच्या नावावर घर? फक्त प्रेम नाही, आता 'लाखोंचा फायदा' होणार! स्टँप ड्युटीपासून टॅक्सपर्यंत मोठी बचत फिक्स

Buying a Home : स्वतःचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण भारतात महिलांसाठी हे स्वप्न आता आणखी सोपं झालं आहे! कारण, सरकार आणि अनेक बँकामहिलांना मालमत्तेच्या मालकीण होण्यासाठी सतत प्रोत्साहन देत आहेत, ज्यामुळे त्यांना घर खरेदी करताना मोठे फायदे मिळत आहेत. तुम्हीही खर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या पत्नीच्या नावे घर खरेदी केल्यास लाखो रुपयांची बचत होऊ शकते.

महिलांसाठी घर खरेदी करणे फायदेशीर व्यवहार का?
भारतात महिलेच्या नावावर मालमत्ता खरेदी करणे ही केवळ एक चांगली गुंतवणूक नाही, तर ती महिलांना आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत करते. जेव्हा एखाद्या महिलेच्या नावावर घर किंवा जमीन असते, तेव्हा तिची आर्थिक सुरक्षा तर वाढतेच, पण कुटुंबाची एकूण आर्थिक स्थितीही सुधारते. याशिवाय, सरकार यासाठी अनेक प्रोत्साहन योजना राबवत आहे, जसे की नोंदणी शुल्कात सूट किंवा मुद्रांक शुल्कात सवलत. इतकेच नाही तर, बँका महिलांवर अधिक विश्वास दाखवत असल्याने, त्यांना सुलभ आणि कमी व्याजदराने गृहकर्ज सारख्या सुविधा देखील मिळतात.

महिलांना कोणते फायदे मिळतात?
स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट : महिलेच्या नावावर मालमत्ता खरेदी केल्यास तुम्हाला स्टॅम्प ड्युटीमध्ये चांगली सूट मिळू शकते. अनेक राज्यांमध्ये, महिलांसाठी हा दर पुरुषांपेक्षा १% ते २% कमी असतो.

  • उदाहरणार्थ, महाराष्ट्रामध्ये, महिलांना घर खरेदी करताना मुद्रांक शुल्कात १% सवलत मिळते.
  • दिल्लीमध्ये, पुरुषांसाठी ६% मुद्रांक शुल्क आकारले जाते, तर महिलांसाठी ते फक्त ४% आहे, म्हणजेच थेट २% बचत होते.
  • हरियाणात ते ७% ऐवजी ५% आहे आणि उत्तर प्रदेशात ७% ऐवजी ६% आहे.
  • याचा अर्थ, ५० लाख रुपयांच्या मालमत्तेवर फक्त १% सूट मिळाली तरी ५०,००० रुपयांची मोठी बचत होऊ शकते. झारखंडसारख्या राज्यात तर महिलांसाठी मुद्रांक शुल्क फक्त १ रुपया ठेवण्यात आले आहे!

गृहकर्जावरील कमी व्याजदर: महिलांसाठी गृहकर्जावरील व्याजदर सामान्यतः पुरुषांपेक्षा थोडे कमी असतात, ज्यामुळे मोठ्या बचतीचा फायदा मिळतो. अनेक बँका महिलांना ०.०५% ते ०.१% या कमी व्याजदराने कर्ज देतात. सुरुवातीला हा फरक छोटासा वाटू शकतो, पण २०-२५ वर्षांच्या गृहकर्जावर यामुळे लाखो रुपयांची बचत होऊ शकते.

प्रधानमंत्री आवास योजनेत (PMAY) विशेष फायदे: प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) महिलांना परवडणारी घरे प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. या योजनेत महिलांना प्राधान्य दिले जाते आणि अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी, महिलेने मालमत्तेची मालकीण असणे आवश्यक आहे. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS) आणि कमी उत्पन्न गटातील (LIG) महिलांना ६.५% पर्यंत व्याज अनुदान मिळू शकते. याचा अर्थ असा की २.६७ लाखांपर्यंत बचत शक्य आहे, ज्यामुळे घर खरेदीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होतो आणि EMI चा भार देखील कमी होतो.

वाचा - घागर भरुनी, दही दूध लोणी विकून...! ही कंपनी २०३५ कोटी रुपयांचा IPO आणणार, सेबीच्या हातात कागदपत्र सोपविले...

कर लाभ: याव्यतिरिक्त, महिला घर खरेदीदारांना आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत मूळ परतफेडीवर १.५ लाखांपर्यंत आणि कलम २४(ब) अंतर्गत व्याज देयकावर २ लाखांपर्यंतची वजावट मिळू शकते.

(टीप: ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. घर खरेदी करण्यापूर्वी स्वतः सर्व माहिती मिळवा आणि तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Buying a Home in India in Wife's Name Tax Benefits, Lower Interest Rates & More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.