अलीकडेच, भारतात सोन्याच्या किंमतींमध्ये वेगानं वाढ दिसून आली आहे. दिवसेंदिवस सोन्याचे दर नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. सतत वाढणाऱ्या किंमती, बाजारातील वाढती मागणी देखील दर्शवित आहेत. याच दरम्यान, उद्योगपती हर्ष गोएंका यांची एक मनोरंजक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
९० च्या दशकात १ किलो सोन्यामध्ये काय खरेदी करता येत होतं आणि आज त्यातून काय खरेदी करता येतं, हे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलंय. ऑक्टोबरच्या सुरुवातीला भारतात सोन्याच्या किंमतींमध्ये जबरदस्त वाढ दिसून आली आहे. दरम्यान, गोएंका यांची पोस्ट गुंतवणुकीची आवड असणाऱ्यांमध्ये खूप व्हायरल होत आहे.
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
१ किलो सोन्याच्या बरोबरीच्या या गाड्या...
गेल्या ३० वर्षांत सोन्याची किंमत किती वेगाने वाढली आहे, हे त्यांनी सांगितले. हाच वेग कायम राहिल्यास २०३० पर्यंत १ किलो सोनं रोल्स-रॉयसच्या किंमतीच्या बरोबरीचे होऊ शकतं, असे गोएंका यांनी म्हटलंय. विनोदी शैलीत त्यांनी लिहिले की, १९९० मध्ये याच सोन्यातून एक मारुति ८०० खरेदी करता येत होती. १९९० पासून ते २०२५ पर्यंत १ किलो सोन्याच्या किंमतीत कोणत्या कार्स आल्या असत्या हे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
1990: 1kg gold = Maruti 800
— Harsh Goenka (@hvgoenka) October 12, 2025
2000: 1kg gold = Esteem
2005: 1kg gold = Innova
2010: 1kg gold = Fortuner
2019: 1kg gold = BMW
2025: 1kg gold = Land Rover
Lesson: Keep the 1kg gold- in 2030 it may equal a Rolls Royce car and in 2040 a private jet🛩️! 😀
काय म्हटलंय त्यांनी आपल्या पोस्टमध्ये?
- १९९०: १ किलो सोनं = मारुति ८००
- २०००: १ किलो सोनं = एस्टीम
- २००५: १ किलो सोनं = इनोव्हा
- २०१०: १ किलो सोनं = फॉर्च्यूनर
- २०१९: १ किलो सोनं = बीएमडब्ल्यू
- २०२५: १ किलो सोनं = लँड रोव्हर
गोएंका यांची पोस्ट व्हायरल
"१ किलो सोनं जपून ठेवा. २०३० मध्ये ते रोल्स-रॉयस कारच्या बरोबरीचं होऊ शकतं आणि २०४० मध्ये कदाचित एका प्रायव्हेट जेटच्या किंमतीइतकं," असं हर्ष गोएंका म्हणाले. हर्ष गोएंका यांची ही पोस्ट एक्स (X) वर खूप व्हायरल होत आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियावरदेखील चर्चा सुरू झाली आहे. अनेक लोकांनी भारतातील सोन्याच्या दरांवर आपले मत व्यक्त केलंय.
किती आहे किंमत?
आज, सराफा बाजारात २४ कॅरेट सोनं जीएसटीसह प्रति १० ग्रॅम सुमारे १,२९,४५२ रुपये झाले आहे, तर चांदी प्रति किलो १,८१,४६० रुपयांनी विकली जात आहे. आज, २३ कॅरेट सोन्याचा दर देखील प्रति १० ग्रॅम ₹१२५,१७९ वर उघडला, जो ₹१,९०६ नं वाढला. जीएसटीसह त्याची किंमत आता ₹१,२८,९३४ आहे. यात मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. २२ कॅरेट सोन्याचा दर ₹१,८०७ ने वाढून प्रति १० ग्रॅम ₹११५,१७९ वर पोहोचला आहे. जीएसटीसह तो ११८६३४ रुपये झालाय. १८ कॅरेट सोन्याचा भाव १४३५ रुपयांनी वाढून ९४२६२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आणि जीएसटीसह त्याची किंमत ९४२६२ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचली. १४ कॅरेट सोन्याचा भावही १११९ रुपयांनी वाढून ७३५२५ रुपयांवर बंद झाला आणि आता जीएसटीसह ७५७२९ रुपयांवर पोहोचला आहे.