Lokmat Money > बिझनेस न्यूज > "कर्ज वसुलीनंतरही विजय मल्ल्याला लक्ष्य का केलं जातंय"; हर्ष गोएंकांनी विचारला सवाल

"कर्ज वसुलीनंतरही विजय मल्ल्याला लक्ष्य का केलं जातंय"; हर्ष गोएंकांनी विचारला सवाल

उद्योगपती हर्ष गोयंका यांनी कर्ज वसूल करूनही विजय मल्ल्याला का लक्ष्य केले जातंय असा सवाल केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 12:57 IST2025-06-06T12:35:08+5:302025-06-06T12:57:08+5:30

उद्योगपती हर्ष गोयंका यांनी कर्ज वसूल करूनही विजय मल्ल्याला का लक्ष्य केले जातंय असा सवाल केला आहे.

Business tycoon Harsh Goenka questioned why Vijay Mallya remains punching bag despite recovering his loans | "कर्ज वसुलीनंतरही विजय मल्ल्याला लक्ष्य का केलं जातंय"; हर्ष गोएंकांनी विचारला सवाल

"कर्ज वसुलीनंतरही विजय मल्ल्याला लक्ष्य का केलं जातंय"; हर्ष गोएंकांनी विचारला सवाल

Harsh Goenka on Vijay Mallya: आयपीएलच्या १८ व्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ चॅम्पियन बनला. आरसीबीच्या विजयानंतर क्रिकेट चाहत्यांसह माजी संघ मालक विजय मल्ल्याने आनंद व्यक्त केला. विजय मल्ल्याने एक्स पोस्टवरुन आरसीबीच्या संघाचे अभिनंदन केले. मात्र त्यानंतर फरार असलेल्या विजय मुल्ल्याच्या कर्जाबाबतच्या चर्चेला पुन्हा जोरदार सुरुवात झाली. मल्ल्याकडून मात्र आपण कर्जाची व्याजासह परतफेड केल्याचा दावा केला जातोय. दुसरीकडे आता काहीजण त्याच्या समर्थनातही उतरल्याचे दिसत आहे. आरपीजी एंटरप्राईजेसचे अध्यक्ष अब्जाधीश उद्योगपती हर्ष गोएंका यांनी मल्ल्याबाबत घेतलेल्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

उद्योगपती हर्ष गोएंका यांनी कर्ज बुडवून पळ काढणाऱ्यांबाबत प्रश्न उपस्थित करुन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. जर विजय मल्ल्याने थकबाकी खरोखरच भरली असेल, तर त्याला बळीचा बकरा का केलं जात आहे? असा सवाल हर्ष गोएंका यांनी केला आहे. न्याय पक्षपाती असू नये, असेही गोएंका यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी बँकांना मल्ल्याने घेतलेल्या कर्जांची सध्याची स्थिती स्पष्ट करण्याचे आवाहन केलं आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गोएंका यांच्या पोस्टवर उत्तर देताना विजय मल्ल्याने आपण कर्जाची परतफेड केली असल्याचे म्हटलं आहे. गोएंका यांच्या या पोस्टमुळे भारतातील सर्वात हाय-प्रोफाइल आर्थिक घोटाळ्यांवरी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

विजय मल्ल्या हे एक भव्य जीवन जगले, हो. कर्ज बुडाले, हो. इतरांसारखे नाही, त्याचे ₹9,000+ कोटींचे कर्ज आता निकाली निघाले आहे असे म्हटले जाते. दरम्यान, मोठे कर्ज बुडालेले बँकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज कपात करून मोकळे होतात. जर कर्ज बुडाले असेल तर बँकांनीच कर्जमुक्त व्हावे. जर नसेल, तर त्याला अजूनही राजकीयदृष्ट्या का लक्ष्य केले जात आहे? न्याय हा निष्पक्ष असला पाहिजे, निवडक नसावा," गोयंका यांनी लिहिले.

"मान्य आहे की, विजय मल्ल्या आलिशान जीवन जगत होता आणि त्याने त्याचे कर्ज फेडले नाही. पण इतर बहुतेकांप्रमाणे, त्याची ९,०००+ कोटी रुपयांची थकबाकी आता चुकती झाल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे मात्र मोठे कर्जबुडवे बँकांकडून मोठ्या प्रमाणात कपात करून मोकाट फिरत आहेत. जर काही थकबाकी असेल तर बँकांनी ती स्पष्टपणे सांगावी. जर नसेल, तर त्याला अजूनही राजकीयदृष्ट्या लक्ष्य का केले जात आहे? न्याय हा निःपक्षपाती असला पाहिजे, निवडक नाही," असं गोएंका यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

विजय मल्ल्यानेही गोएंका यांच्या पोस्टवर लगेचच उत्तर देत त्यांचे आभार मानले. तसेच भारतीय बँकांनी आधीच आपल्याकडून देयकापेक्षा जास्त रक्कम वसूल केल्याचे मल्ल्याने म्हटलं. "केंद्रीय अर्थ मंत्रालयाने लेखी स्वरूपात सांगितले आहे की बँकांनी माझ्याकडून ६,२०३ कोटी रुपयांच्या डीआरटी जजमेंट कर्जाविरुद्ध १४,१०० कोटी रुपये वसूल केले आहेत. हा उघड भेदभाव कशासाठी?" असं मल्ल्याने म्हटलं.

दरम्यान, अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अंमलबजावणी संचालनालयाने मल्ल्या प्रकरणासह विविध बँकिंग घोटाळ्यांमधून २२,२८० कोटी रुपये वसूल केले आहेत.

Web Title: Business tycoon Harsh Goenka questioned why Vijay Mallya remains punching bag despite recovering his loans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.