BSNL Vs. Jio Recharge Plans: मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशातील कोट्यवधी युजर्स जिओशी कनेक्ट आहेत, पण जुलैमध्ये रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केल्यापासून जिओ युजर्समध्ये घट झाली आहे. याशिवाय सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने स्वस्त रिचार्ज प्लॅन आणल्यामुळे अनेकांनी आपले नंबर बीएसएनएलला पोर्ट केले आहेत, त्यामुळे जिओसह अनेक टेलिकॉम कंपन्यांचे युजर्स कमी झाले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
https://www.whatsapp.com/channel/0029VaBACbfInlqHyOB7FE09
आज आम्ही तुम्हाला जिओ आणि बीएसएनएलच्या ७० दिवसांच्या वैधतेच्या प्लानबद्दल सांगणार आहोत. दोन्ही कंपन्यांच्या समान वैधतेच्या प्लान्सबद्दल जाणून घेऊन कोणती कंपनी आपल्या युजर्सना चांगल्या ऑफर्स देत आहे याचा सहज अंदाज लावू शकता. चला जाणून घेऊया.
जिओचा ७० दिवसांचा वैधतेचा प्लॅन
जिओचा ७० दिवसांची वैधता असलेला प्लान तुम्ही ६६६ रुपयांत खरेदी करू शकता. ६६६ रुपयांच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा मिळेल. दररोज १.५ जीबी हाय स्पीड डेटा आणि दररोज १०० फ्री एसएमएसचा लाभ मिळेल. इतकंच नाही तर जिओ युजर्संना या प्लानमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा फ्री अॅक्सेस देखील मिळणार आहे.
७० दिवसांचा वैधतेचा प्लान
बीएसएनएलचा ७० दिवसांची वैधता असलेला प्लान तुम्ही फक्त १९७ रुपयांत खरेदी करू शकता. १९७ रुपयांच्या या प्लानमध्ये तुम्हाला पहिल्या १८ दिवसांत कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा फायदा मिळेल. तसेच दररोज २ जीबी हायस्पीड डेटा आणि दररोज १०० फ्री एसएमएसही मिळतील. १८ दिवसांनंतर उरलेल्या दिवसांसाठी तुमचा नंबर फक्त अॅक्टिव्ह राहिल.