Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > मुंबई शेअर बाजार पोहोचला आठवड्याच्या नीचांकावर

मुंबई शेअर बाजार पोहोचला आठवड्याच्या नीचांकावर

नफेखोरीच्या दबावाने मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी घट नोंदली.

By admin | Updated: July 29, 2014 01:48 IST2014-07-29T01:48:19+5:302014-07-29T01:48:19+5:30

नफेखोरीच्या दबावाने मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी घट नोंदली.

The Bombay Stock Exchange reached the week low | मुंबई शेअर बाजार पोहोचला आठवड्याच्या नीचांकावर

मुंबई शेअर बाजार पोहोचला आठवड्याच्या नीचांकावर

मुंबई : नफेखोरीच्या दबावाने मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी घट नोंदली. सेन्सेक्स १३५.५२ अंकांनी घसरून २५,९९१.२३ अंकांवर बंद झाला. हा एका आठवड्याचा नीचांक आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही घसरण होऊन तो ७,७४८.७० अंकांवर बंद
झाला.
धातू, तेल आणि गॅस व बांधकाम क्षेत्रातील शेअरमध्ये अलीकडेच तेजीनंतर गुंतवणूकदारांच्या विक्रीत घट नोंदली.
रविवारची सुटी आणि गुरुवारी डेरिव्हेटिव्हज् करारांचा मासिक निपटारा समाप्त होण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स व निफ्टीतही घट नोंदली गेली. किरकोळ गुंतवणूकदारांकडून मागणी घटल्याने छोट्या कंपन्या व मध्यम कंपन्यांच्या कमी व मध्यम कालावधीच्या शेअरमध्ये घट
झाली.
तीस कंपन्यांचा सेन्सेक्स मजबुतीने उघडला आणि सुरुवातीच्या व्यवहारात एकावेळी २६,१८१.८३ अंकांपर्यंत पोहोचला; मात्र नंतर नफेखोरीमुळे यात घसरण झाली आणि तो १३५.५२ अंक वा ०.५२ टक्क्यांनी घटून २५,९९१.२३ अंकांवर बंद झाला. दिवसभरात तो २५,९००.२५ अंकांपर्यंत गेला होता.
२१ जुलैनंतर सेन्सेक्सची ही सर्वांत खालची पातळी आहे. त्या दिवशी सेन्सेक्स २५,७१५.१७ अंकांवर पोहोचला होता.
५० शेअरच्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ४१.७५ अंक वा ०.५४ टक्क्यांच्या घसरणीसह एक आठवड्याच्या नीचांकी पातळीवर, ७,७४८.७० अंकांवर बंद झाला. शुक्रवारी यात ४०हून अधिक अंकांची घसरण झाली होती.
उल्लेखनीय म्हणजे, १५ जुलै ते २५ जुलै या दरम्यान आठ सत्रांमध्ये सेन्सेक्स व निफ्टी ५ टक्क्यांहून अधिकच्या तेजीसह विक्रमी पातळीवर पोहोचला होता. (प्रतिनिधी)

Web Title: The Bombay Stock Exchange reached the week low