नवी दिल्ली : फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्याची सुरुवात जोरदार होणार आहे. गुंतवणूकदारांसाठी या आठवड्यात सहा नव्या आयपीओंमुळे पैसे गुंतवण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये एक आयपीओ मेन बोर्डवर, तर पाच लघू-मध्यम कंपन्या अर्थात एसएमई क्षेत्राशी संबंधित असणार आहेत. (Upcoming IPO latest Update)
पुढील आठवड्यात आणखी दोन आयपी लिस्ट होणार आहेत. ही संधी सोडायची नसेल तर गुंतवणूकदारांनी आपले पैसे तयार ठेवावेत.
ॲरिसइन्फ्रा सोल्युशन्स लिमिटेडचा एकमेव आयपीओ पुढील आठवड्यात मेन बोर्डवर उघडणार आहे. पुढील आठवड्यात एसएमई क्षेत्रामध्ये ५ आयपीओ येणार आहेत. यात चामुंडा इलेक्ट्रिकल्स, केन एन्टरप्राईझेस, एमविल हेल्थकेअर, रेडीमिक्स कन्स्ट्रक्शन्स आणि एलिगेंज इंटेरिअर्स यांचा समावेश असणार आहे.
आणखी २ लिस्ट होणार
पुढील आठवड्यात दोन आयपीओ लिस्ट होणार आहेत. यापैकी एक मेन बोर्ड, तर दुसरा एसएमई सेगमेंटमधील असेल. मुख्य बोर्डवर डॉ. अग्रवाल्स हेल्थकेअर लिमिडेटचा आयपीओ बुधवारी (दि. ५), तर एसएमई क्षेत्रातील मालपाणी पाइप्स ॲण्ड फिटिंग्स लिमिटेडचा आयपीओ मंगळवारी (दि. ४) लिस्ट होईल.