Lokmat Money > बिझनेस न्यूज > उद्योगविश्वात मोठी खळबळ! हिंदुजा घराण्याच्या चौघांना तुरुंगवासाची शिक्षा; कामगारांचे शोषण केले

उद्योगविश्वात मोठी खळबळ! हिंदुजा घराण्याच्या चौघांना तुरुंगवासाची शिक्षा; कामगारांचे शोषण केले

स्वित्झर्लंडमधीन न्यायालयाने हिंदुजांना चार ते साडे चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यामुळे उद्योगविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 11:20 PM2024-06-21T23:20:49+5:302024-06-21T23:21:12+5:30

स्वित्झर्लंडमधीन न्यायालयाने हिंदुजांना चार ते साडे चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यामुळे उद्योगविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. 

Big news in the industry! Jail sentence for four of Prakash Hinduja family members; Workers were exploited, humen trafficking | उद्योगविश्वात मोठी खळबळ! हिंदुजा घराण्याच्या चौघांना तुरुंगवासाची शिक्षा; कामगारांचे शोषण केले

उद्योगविश्वात मोठी खळबळ! हिंदुजा घराण्याच्या चौघांना तुरुंगवासाची शिक्षा; कामगारांचे शोषण केले

घरातील कामगारांचे शोषण केल्याप्रकरणी भारतातील अब्जाधीश उद्योगपती हिंदुजा घराण्यातील चार जणांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. स्वित्झर्लंडमधीन न्यायालयाने हिंदुजांना चार ते साडे चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यामुळे उद्योगविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. 

प्रकाश हिंदुजा, त्यांची पत्नी, मुलगा आणि सून यांना ही शिक्षा झाली आहे. जिनेव्हा येथील त्यांच्या आलिशान लेकसाइड व्हिलामध्ये काम करणारे कर्मचारी हे तस्करी करून आणले होते, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. यामध्ये अशिक्षित कामगारही होते. हे सर्व भारतीय होते. 

स्विस न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली तेव्हा हिंदुजांपैकी कोणीही तिथे हजर नव्हते. हिंदुजा यांचे व्यवसाय व्यवस्थापक यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. त्यांनाही १८ महिन्यांची शिक्षा झाली आहे. न्यायालयाने हिंदुजांना त्यांच्या कामगारांचे शोषण करणे आणि बेकायदेशीर रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल दोषी ठरवले.

कर्मचाऱ्यांचे पासपोर्ट काढून घेणे, त्यांना स्विस फ्रँक्समध्ये मोबदला नाही तर रुपयात पैसे देणे, त्यांना व्हिला सोडण्यापासून रोखणे आणि त्यांना स्वित्झर्लंडमध्ये जास्त तास काम करण्यास भाग पाडणे असा आरोप कुटुंबावर ठेवण्यात आला होता. कामगारांना दिवसातून 18 तास काम करण्यास भाग पाडले जात होते. सुट्टीचा वेळही कमी देण्यात येत होता. तसेच स्विस कायद्यानुसार जेवढा पगार त्यांना द्यायला हवा त्याच्या १० टक्केच पगार त्यांना दिला जात होता. 

कायदेशीर शुल्क आणि संभाव्य दंड भरण्यासाठी स्विस अधिकाऱ्यांनी हिंदूजांकडून हिरे, माणिक, एक प्लॅटिनम नेकलेस आणि इतर दागिने आणि मालमत्ता आधीच जप्त केल्या आहेत. 
 

Web Title: Big news in the industry! Jail sentence for four of Prakash Hinduja family members; Workers were exploited, humen trafficking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.