केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी अर्थसंकल्प २०२६-२७ सादर केला. या अर्थसंकल्पात गुजरातला मोठे गिफ्ट देण्यात आले आहे. गुजरात आणि पश्चिम बंगालला जोडणाऱ्या भव्य प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक मालवाहतुकीला चालना देण्यासाठी पश्चिमेकडील सूरत आणि पूर्वेकडील डानकुनी या शहरांना जोडणारा नवा 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर' (Dedicated Freight Corridor) तरयार करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे.
देशाची दोन टोके जोडली जाणार -
पूर्व आणि पश्चिम भारतामध्ये कार्गोची पर्यावरणपूरक वाहतूक मजबूत करणे, हा या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पासंदर्भा बोलताना सीतारमण म्हणाल्या, हा प्रकल्प भविष्यासाठी सज्ज असलेल्या भारताचे (Future Ready India) व्हिजन साकार करेल. यामुळे देशाच्या दोन टोकांमधील दळणवळण अधिक वेगवान आणि शाश्वत होईल.
मालवाहतूक सोपी होईल -
हा कॉरिडॉर भविष्यात देशातील सर्वात मोठा फ्रेट लिंक म्हणून समोर येईल. या प्रकल्पामुळे पूर्वेकडील प्रमुख औद्योगिक केंद्रे थेट पश्चिमेकडील बंदरांशी आणि उत्पादन केंद्रांशी मालगाडी नेटवर्कद्वारे जोडली जातील. यामुळे मालवाहतूक अधिक गतिमान होण्यास मदत होईल.
रेल्वे लॉजिस्टिकवर विशेष भर -
खरे तर लुधियाना ते डानकुनी आणि दादरी ते जेएनपीटी या कॉरिडॉर्सच्या यशानंतर हा नवा निर्णय घेण्यात आला आहे. प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक वेगळी केल्यामुळे रेल्वे लॉजिस्टिकमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. यामुळे मालवाहू क्षमताही वाढली आहे. गुजरात-डानकुनी कॉरेडोरमुळे सूरतच्या टेक्सटाइल उद्योगालाही मोठी मदत मिळेल.
