Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?

Gold Silver Rate Today 4 Nov: लग्नसराईचा काळ सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज, मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी सोने-चांदीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 15:43 IST2025-11-04T15:43:25+5:302025-11-04T15:43:25+5:30

Gold Silver Rate Today 4 Nov: लग्नसराईचा काळ सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज, मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी सोने-चांदीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळत आहे.

Big drop in gold and silver prices 4 nov 2025 Silver is rs 3500 by how much has Gold become cheaper | Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?

Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?

Gold Silver Price 4 Nov: लग्नसराईचा काळ सुरू होताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज, मंगळवार ४ नोव्हेंबर रोजी सोने-चांदीच्या दरात मोठा बदल पाहायला मिळत आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव ८६१ रुपयांनी स्वस्त होऊन १,१९,९१६ रुपये प्रति १० ग्रॅम वर आला आहे. जीएसटीसह (GST) याची किंमत आता १२३५१३ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे.

दुसरीकडे, चांदीचा भाव जीएसटीसह १५०१७४ रुपये प्रति किलो आहे. आज चांदी जीएसटी वगळता ३५०० रुपयांनी घसरून १,४५,८०० रुपये प्रति किलो दराने उघडली.

Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?

विक्रमी उच्चांकावरून मोठी घसरण

सोन्याचे दर १७ ऑक्टोबरच्या विक्रमी उच्चांकावरून आतापर्यंत १०८५७ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. चांदीचे भाव १४ ऑक्टोबरच्या विक्रमी उच्चांकावरून २३३०० रुपयांनी खाली आले आहेत. आयबीजेए (IBJA) दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजेच्या आसपास दर जारी केले जातात.

कॅरेटनुसार आजचे सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

आज कॅरेटनुसार सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मेकिंग चार्ज वगळता आणि जीएसटीसह दर खालीलप्रमाणे आहेत:

२३ कॅरेट सोन्याचा भाव ८५७ रुपयांनी स्वस्त झाला आहे. जीएसटी वगळता तो ११९४३६ रुपये आहे आणि जीएसटीसह त्याची किंमत आता १२३०१९ रुपये झाली आहे.

२२ कॅरेट सोन्याची किंमत ७८९ रुपयांनी घसरून १०९८४३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. जीएसटीसह तो दर ११३१३८ रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्यात ६४६ रुपयांची घसरण झाली आहे. जीएसटी वगळता तो ९०८३५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे आणि जीएसटीसह त्याची किंमत ९२४३५ रुपये प्रति १० ग्रॅमवर आली आहे.

Web Title : सोने-चांदी की कीमतों में गिरावट: चांदी ₹3500 गिरी, सोना भी सस्ता!

Web Summary : सोने और चांदी की कीमतों में भारी गिरावट दर्ज की गई। सोने में ₹861 प्रति 10 ग्राम की गिरावट आई, जबकि चांदी ₹3500 प्रति किलो सस्ती हुई। शादी के मौसम में यह गिरावट उपभोक्ताओं के लिए राहत की खबर है।

Web Title : Gold, Silver Prices Plunge: Silver Down ₹3500, Gold Cheaper Too!

Web Summary : Gold and silver prices witnessed a significant drop. Gold fell by ₹861 per 10 grams, while silver plummeted by ₹3500 per kg. This decline occurs amidst the wedding season, offering some relief to consumers.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.